कोल्हापूर देशात हॉटस्पॉट ; अधिक दक्षता घेण्याच्या केंद्र सरकारच्या सूचना  

Kolhapur hotspot in country
Kolhapur hotspot in country

कोल्हापूर :  जिल्ह्यातील कोरोना संसर्ग आणि मृत्युदराचे प्रमाण गंभीर असल्याने जिल्हा देशात हॉटस्पॉट बनला आहे. कंटेन्मेंट झोनचे नियम काटेकोरपणे पाळणे आणि चाचण्या वाढविण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. कोरोना रोखण्यासाठी युद्धपातळीवर उपाय राबविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. देशातील पाच राज्ये आणि एक केंद्रशासित प्रदेशातील 35 जिल्ह्यांना केंद्रसरकारने या सूचना दिल्या आहेत. 

यामध्ये राज्यातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, मुंबई, मुंबई उपनगरासह 17 जिल्ह्यांचा समावेश आहे. 

केंद्रातील आरोग्य मंत्रालयाकडून देशातील कोरोना स्थितीचा नुकताच आढावा घेण्यात आला. कोरोनाच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या 35 जिल्ह्यातील कंटेनमेंट झोनमध्ये लॉकडाउनच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, अशा सूचना देण्यात आल्या. तसेच कोरोनाचा अधिक प्रादुर्भाव असलेल्या भागात ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करण्यावर भर देणे, टिजेन चाचणीचे प्रमाण वाढवावे असे निर्देश दिले. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भुषण यांनी पाच राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशाच्या आरोग्य सचिवांशी व्हिसीद्वारे चर्चा केली. या पाच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील एकूण 35 जिल्ह्यातील संसर्गाचे प्रमाण चिंताजनक असल्याने तेथे आणखी दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या. संबंधित जिल्ह्यात कोरोना रोखण्यासाठी राबवण्यात येणारे उपाय अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी त्याचा आढावा घ्यावा आणि त्यात सुधारणा कराव्यात असेही जिल्हाधिकारी आणि प्रशासनाला सांगण्यात आले. 

या वेळी राज्य सचिवांनी राज्याच्या स्थितीची आणि उपायांची माहिती सादर केली. या बैठकीत कोरोनाबाधित जिल्ह्याचे आरोग्य सचिव, जिल्हाधिकारी, महानगरपालिकेचे आयुक्त, प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. होम आयसोलेशनमधील रुग्ण आणि कोविड सेंटरमध्ये नव्याने दाखल झालेल्या रुग्णांच्या स्थितीवर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी आरोग्य मंत्रालयाच्या नियमांचे पालन करण्याबाबत सजग राहवे, असे सांगण्यात आले. 

पुढील एक महिन्यात राबवण्यात येणाऱ्या उपायांवरही यावेळी चर्चा झाली. या वेळी उपस्थित जिल्ह्याधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील आयसोलेशन वॉर्ड, कोविड सेंटर, आयसीयू वॉर्ड, व्हेंटिलेटर, ऑक्‍सिजन बेडच्या उपलब्धतेची माहिती दिली. 

देशातील 35 जिल्हे संवेदनशील 

दिल्ली राज्य 
11 जिल्हे 
पश्‍चिम बंगाल: कोलकता, हावडा, नॉर्थ 24 परगणा आणि चोवीस साउथ परगणा 

महाराष्ट्र : पुणे, नागपूर, ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर, कोल्हापूर, सांगली, नाशिक, नगर, रायगड, जळगाव, सोलापूर, सातारा, पालघर, औरंगाबाद, नांदेड, धुळे 
गुजरात : सुरत 
पुदुच्चेरी : पुदुच्चेरी 
झारखंड : इस्ट सिंघभूम 

संपादन - धनाजी सुर्वे 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com