आत नियम मोडणाऱ्यांची खैर नाही! कोल्हापुरातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीने घेतलाय कडक निर्णय

there will be legal action on kolhapur shiroli village people
there will be legal action on kolhapur shiroli village people
Updated on: 

शिरोली पुलाची : येथील कोरोनाग्रस्तांची संख्या दोनशेवर गेली आहे. कोरोना रुग्णांची संख्या अटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊनसह विविध उपाययोजना प्रशासनाकडून राबवण्यात येत आहेत. मात्र त्यास नागरिकांचा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे गावात विना मास्क फिरणे, सोशल डिस्टन्स न पाळणे, यासह सार्वजनिक ठिकाणी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय ग्रामपंचायत व व्यवस्थापन समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. 


जिल्हयातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या शिरोलीत जुलै अखेरपर्यंत कोरोनाचे जेमतेम तीन रुग्ण होते. त्यामुळे शिरोली ग्रामपंचायत, कोरोना दक्षता समिती, पोलीस प्रशासन व आरोग्य विभागाच्या कामाचे कौतुक झाले. मात्र त्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढत गेली. ही संख्या अटोक्यात आणण्यासाठी पाच दिवसाचा लॉकडाऊन केला, विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. तरीही त्यास नागरिकांचा प्रतिसाद मिळत नव्हता. होम क्वारंटाईन व्यक्ती गावात खुलेआम फिरत होत्या, तर आजारी व्यक्ती कोरोनाची चाचणी करून घेत नव्हती, यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. 

त्यामुळे ग्रामपंचायत व व्यवस्थापन समितीच्या बैठकीत कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कठोर निर्णय घेण्याचे ठरले. 
या नियमाचे उल्लंघन केल्यास दुकानदारास जागेवर पाच हजार रुपये दंड करून तीन दिवस दुकान सील केले जाणार आहे. सार्वजनिक ठिकाणी अथवा रस्त्यावर थुंकल्यास पाचशे रुपये दंड वसूल करून माहिती देणाऱ्यास अडीचशे रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच अंत्यविधीसाठी पीपीई किट घालून फक्त दहा लोकांनी उपस्थित राहण्याचे आहे. ज्यादा व्यक्ती आढळल्यास  कारवाई केली जाणार आहे. याबाबतचे डिजीटल फलक ग्रामपंचायतीकडून चौकाचौकात उभारले आहेत. ही कारवाई ग्रामपंचायत व एमआयडीसी पोलीस ठाणेच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येणार आहे. त्यामुळे आता तरी नागरिक नियमांचे पालक करून प्रशासनाला सहकार्य करणार की मला काही होत नाही, या अविरभावात गावातून फिरत राहणार याकडे लक्ष लागले आहे. 

सरपंच शशिकांत खवरे, उपसरपंच सुरेश यादव, ग्रामविकास अधिकारी ए. एस .कठारे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सतिश पाटील, महेश चव्हाण, मुकुंद नाळे, उत्तम पाटील, रणजीत केळुसकर आदी उपस्थित होते.

दरम्यान, शिरोलीतील कोरोना रूग्णाची संख्या आज २०५ झाली आहे. त्यापैकी दहा जण मयत असून ३३ जण कोरोनामुक्त झालेत.

कोरोना रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे. नागरिकांच्या सहकार्याशिवाय कोरोनावर नियंत्रण राखणे शक्‍य नाही. त्यामुळे प्रशासनाला सहकार्य करावे. अन्यथा, प्रशासनाच्या मदतीने कारवाई करावी लागेल.

- शशिकांत खवरे, सरपंच

संपादन - धनाजी सुर्वे 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur Drought, Six Talukas, District Bank Resolution
32-year-old Vikas Chougale drowned in Kasari River
Pune MLC Election, Graduate Teacher Seats,
Maharashtra sugar season
Marathi News Esakal
www.esakal.com