विना मास्क फिरणाऱ्यांना कागल नगरपालिकेचा दणका 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

एका दिवसात सुमारे १८ हजार २२० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

कागल : वारंवार सूचना देऊनही शहरात विना मास्क फिरणाऱ्या शंभरहून अधिक लोकांवर कागल नगरपालिकेने दंडात्मक कारवाई केली आहे. त्यांच्याकडून एका दिवसात सुमारे १८ हजार २२० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

शासनाने लॉकडाऊन शिथील करत काही उद्योगधंदे सुरु केले. शहरातील दुकानांना नियमांच्या अधीन राहून दुकाने उघडण्यास परवानगी दिली, त्यामुळे शहरात नागरिकांची गर्दी वाढू लागली. काही नागरिक बिनधास्तपणे फिरू लागले आहेत. सोशल डिस्टन्स पाळणे आणि मास्क लावणे याकडे नागरिकांचे दुर्लक्ष होऊ लागले आहे. सोमवारी शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेने सकाळपासूनच छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकात विना मास्क शहरात येणार्‍या व फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली. एका दिवसामध्ये पालिकेने विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून १८ हजार २२० इतका दंड वसूल केला. 

हे पण वाचा - ते गावात आले आणि गावाची झोपच का उडाली ते वाचाच 

हे पण वाचा -  अंत्यसंस्कार पडले महागात : स्मशानभूमीतच न्यायला आले पोलिस 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolhapur kagal municipality Fine who without mask entry in city