कोल्हापूर ः सुरक्षित प्रवासी सेवा देणाऱ्या एसटी महामंडळाला कोरोनाकाळात कोट्यवधी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागले. त्यामुळे अडचणीत असलेल्या एसटी महामंडळाला मदत करण्यासाठी तसेच प्रवाशांना सौजन्यशील प्रवासी सेवा देण्यासाठी "बस फॉर अस' या स्वयंसेवी संस्थेने पुढाकार घेतला आहे. यासंस्थेने एसटीची सीटर स्लिपर आराम बस दत्तक घेतली आहे. या बसव्दारे "कोल्हापूर-मुंबई-कोल्हापूर' अशा मार्गावर "सुपर फास्ट रायडर' म्हणून ही बस प्रवासी वाहतूक करणार आहे. प्रजासत्ताकदिनापासून

26 मार्चपर्यंत प्रायोगिक तत्वावरही गाडी संस्थे तर्फे चालविण्यात येणार आहे
नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने अनेकजण मुंबईला ये-जा करीत असतात, अशा प्रवाशांना एसटीचा सुरक्षीत प्रवास करता यावा, यासाठी "बस फॉर अस' स्वयंसेवी संस्थेने एसटी महामंडळाची स्लिपर सीटर बस दत्तक घेतली असून या बसेस बायपास मार्गे कोल्हापूर - मुंबई - मार्गावर धावणार आहे. मोजकेचे थांबे घेऊन सलग धावणारी ही बस कमी वेळात मुंबई व कोल्हापूरात पोचणार आहे.
या बसमध्ये झोपून व आरामात बसून प्रवास करण्याची सुविधा आहे. 50 सीटरचीही बस आहे. या बसमध्ये सॅनिटायझर, मोबाईल बॅटरी चॅर्जिंग, व्हायफाय, अशा सुविधा असणार आहे. या बसचे व्यवस्थापन हे "बस फॉर अस' या संस्था करणार आहे. यात बस प्रवाशांना सौजन्यशील वागणूक मिळावी, गाडीच्या वेळेच माहिती मिळावी, गाडी अचूक वेळेत सोडणे, प्रवाशांना उपयुक्त सुविधा देणे, यापासून ते गाडीच्या तांत्रीक क्षमते पर्यंतच्या समस्या वेळोवेळी दुर करणे. त्यासाठी प्रवाशाच्या सुचना, प्रतिक्रीया जाणून घेणार आहे.
वरील उपक्रमामुळे प्रवाशांना सौजन्यशील वागणूक मिळावी, सुरक्षीत प्रवास घडावा, यातून एसटीच्या प्रवासी संख्या व महसुलात वाढ व्हावी, अशी अपेक्षा आहे. त्यासाठी येत्या 26 मार्चपर्यंत प्रायोगिक तत्वावरही गाडी संस्थे तर्फे चालविण्यात येणार आहे.
प्रजासत्ताकदिनी उद्घाटन
"बस फॉर अस' या संस्थेने दत्तक घेतलेली बस सुपर फास्ट बायपास रायडर म्हणून प्रजासत्ताकदिनी (ता.26) धावणार आहे. त्यासाठी कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकावर बस सेवेचे उद्घघाटन होईल, या बसची माहिती देण्यासाठी मुंबई व कोल्हापूर येथे स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला आहे, अशी माहिती एसटीच्या वरिष्ठ सुत्रांकडून देण्यात आली.
संपादन - यशवंत केसरकर