विना मास्क फिरणाऱ्यांना कोल्हापूर महानगरपालिकेचा दणका 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 15 September 2020

प्रशासनाने विना मास्क फिरणाऱ्यावर कारवाईसाठी विशेष पथके तैनात केली आहेत 

कोल्हापूर - शहरात विना मास्क फिरणे, सामाजिक अंतर न ठेवणे, हॅंडग्लोव्ह न घालणाऱ्या दुकानदार, व्यावसायिकांकडून आजअखेर तब्बल 31 लाख 33 हजार 785 रुपये दंड महानगरपालिकेच्या पथकांनी वसूल केल्याची माहिती आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिली. 

नागरिकांनी अत्यावश्‍यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन करून आयुक्त डॉ. कलशेट्टी म्हणाले, ""कोरोनाला रोखण्यासाठी पालिका प्रशासन युद्धपातळीवर उपाययोजना राबवित आहे. नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे काटेकोर करून पालिका प्रशासनास सहकार्य करावे. यापुढील काळातही विनामास्क फिरणाऱ्यांवर, सामाजिक अंतर न पाळणाऱ्या तसेच हॅंडग्लोव्हजशिवाय भाजी विकणाऱ्यांसह दुकानदारांवर कडक कारवाई करण्यात येईल.'' 

प्रशासनाने विना मास्क फिरणाऱ्यावर कारवाईसाठी विशेष पथके तैनात केली असून आजअखेर शहरातील नागरिकांकडून 31 लाख 3 हजार 785 रुपये दंड वसूल केला आहे. यामध्ये केएमटीच्या दोन पथकांकडून 13 लाख 3 हजार 285 रुपये तर पालिकेच्या तीन पथकांकडून 18 लाख 500 इतका दंड वसूल केला. कारवाईत पोलिस दल आणि केएमटी व महानगरपालिकेचे कर्मचाऱ्यांची पथके कार्यरत आहेत. 

हे पण वाचा होणार होता पीएसआय पण झाला गजाआड

 

फ्लॅटवासियांना दंड 

ताराबाई पार्क येथील रॉयल आर्च इमारतीत गणेश उत्सवात विनामास्क व सामाजिक अंतर न पाळल्याने या सोसायटीमधील फ्लॅटधारकांकडून अग्निशमन दलाने तीस हजार दंड वसूल केला. 

हे पण वाचा पाच लाखांसाठी सासरच्यांनी छळल्याने विवाहितेने दिला जीव

 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolhapur municipal corporation action on without mask people