पाच लाखांसाठी सासरच्यांनी छळल्याने विवाहितेने दिला जीव 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 14 September 2020

घर बांधणीसाठी माहेरहून पाच लाख रुपये आणण्यासाठी सासरच्या मंडळींकडून तिचा छळ करण्यात येत होता

इचलकरंजी - नवीन घर घेण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह तिघांवर शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. विवाहितेचे वडील सुरेश उत्तम लोटके (जवाहरनगर) यांनी तक्रार दिली आहे. अश्‍विनी आदिक टकले (वय 30, इंदिरा कॉलनी) असे मृत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी पती अदिक महादेव टकले, सासू सुलोचना महादेव टकले, सासरा महादेव भानुदास टकले यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे.

 
याबाबत अधिक माहिती अशी, अश्‍विनीचा विवाह दहा वर्षांपूर्वी अदिक टकलेशी झाला आहे. त्यांना 14 महिन्यांचा मुलगा आहे. घर बांधणीसाठी माहेरहून पाच लाख रुपये आणण्यासाठी सासरच्या मंडळींकडून तिचा छळ करण्यात येत होता. दोन लाख रुपये दिले होते. उर्वरित तीन लाख रुपये आणण्यासाठी तिचा छळ सुरू होता. त्रासाला कंटाळून अश्‍विनी हिने 13 सप्टेंबरला विषारी द्रव प्राशन केले.

हे पण वाचा -  आण्णा तुम्ही जा... मायला, बारक्‍याला सांभाळा

 

पती अदिकने तिला तातडीने शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. याबाबत अश्‍विनीच्या वडिलांनी तक्रार दिल्यानंतर पतीसह तिघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.  

हे पण वाचामराठा समाजाला आरक्षण देणारच! या मंत्र्याने दिली ग्वाही

 

संपादन - धनाजी सुर्वे 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: married woman suicide in kolhapur ichalkaranji