कोल्हापूर महापालिका निवडणूक: नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी बावीस प्रभागांचे आरक्षण झाले निश्‍चित 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 21 December 2020

अकरा प्रभाग पुरुष व अकरा प्रभाग महिलांसाठी आरक्षित केले जाणार आहेत.

कोल्हापूर : महापालिकेच्या निवडणुकीसाठी आज सकाळी अकरापासून आरक्षण सोडतीला प्रारंभ झाला असून पहिल्या टप्प्यात अनुसुचित जाती प्रवर्गासाठीच्या प्रभागांची सोडत झाली. एकूण अकरा प्रभागापैकी पाच प्रभाग पुरूषांसाठी तर सहा प्रभाग महिलांसाठी आरक्षित करण्यात आले. त्यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) प्रवर्गासाठी एकूण बावीस प्रभागांचे आरक्षण निश्‍चित झाले असून त्यापैकी अकरा प्रभाग पुरुष व अकरा प्रभाग महिलांसाठी आरक्षित केले जाणार आहेत. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात ही प्रक्रिया सुरू असून परिसरात इच्छुक उमेदवार आणि समर्थकांनी मोठी गर्दी केली आहे. 

प्रभाग क्रमांक 15 (कनाननगर), प्रभाग क्रमांक 21 (टेंबलाईवाडी), प्रभाग क्रमांक 25 (शाहूपुरी तालीम), प्रभाग क्रमांक 26 (कॉमर्स कॉलेज), प्रभाग क्रमांक 36 (राजारामपुरी), प्रभाग क्रमांक 49 (रंकाळा स्टॅंड), प्रभाग क्रमांक 50 (पंचगंगा तालीम), प्रभाग क्रमांक 52 (बलराम कॉलनी), प्रभाग क्रमांक 53 (दुधाळी पॅव्हेलियन), प्रभाग क्रमांक 56 (संभाजीनगर बसस्थानक), प्रभाग क्रमांक 59 (नेहरूनगर), प्रभाग 64 (शिवाजी विद्यापीठ, कृषी महाविद्यालय), प्रभाग क्रमांक 72 (फुलेवाडी), प्रभाग क्रमांक 73 (फुलेवाडी रिंगरोड), प्रभाग क्रमांक 80 (कणेरकर नगर, क्रांतिसिंह नाना पाटीलनगर), प्रभाग क्रमांक 38 (टाकाळा खण- माळी कॉलनी), प्रभाग क्रमांक 23 (रूईकर कॉलनी), प्रभाग क्रमांक 71 (रंकाळा तलाव), प्रभाग क्रमांक 13 (रमणमळा), प्रभाग क्रमांक 22 (विक्रमनगर), प्रभाग क्रमांक 24 (साईक्‍स एक्‍स्टेन्शन), प्रभाग क्रमांक 18 (महाडिक वसाहत). 
 
अनुसुचित जाती आरक्षित प्रभाग असे... 
0 अनुसुचित जाती प्रवर्ग (महिला) आरक्षित प्रभाग असे ः प्रभाग क्रमांक 30 (खोलखंडोबा), प्रभाग क्रमांक 67 (रामानंदनगर-जरगनगर), प्रभाग क्रमांक 75 (आपटेनगर-तुळजाभवानी), प्रभाग क्रमांक 40 (दौलतनगर), प्रभाग क्रमांक 16 (शिवाजी पार्क), प्रभाग क्रमांक 19 (मुक्तसैनिक वसाहत). 
0 अनुसुचित जाती प्रवर्ग (पुरूष) आरक्षित प्रभाग असे ः प्रभाग क्रमांक 7 (सर्किट हाऊस), प्रभाग क्रमांक 8 (भोसलेवाडी- कदमवाडी), प्रभाग क्रमांक 20 (राजर्षी छत्रपती शाहू मार्केट यार्ड), प्रभाग क्रमांक 62 (बुध्द गार्डन), प्रभाग क्रमांक 79 (सुर्वेनगर). 

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolhapur municipal corporation Leaving the reservation second result