सर्वसामान्यांच्या खिशाला लागणार कात्री : महापालिकेच्या आरोग्यसेवा महागल्या

सकाळ वृत्तसेवा
Monday, 25 January 2021

कोरोना काळात या शुल्कवाढीच्या अंमलबजावणीस तात्पुरती स्थगिती दिली होती. मात्र, दोन दिवसापासून याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

कोल्हापूर : महापालिकेच्या आरोग्यसेवा आता महागल्या आहेत. महापालिकेने या सेवाशुल्कात वाढ केली असून, नागरिकांना आता महापालिकेच्या सेवा उपभोगतानाही जादा पैसे मोजावे लागणार आहेत. महापालिकेच्या कोणत्याही रुग्णालयात आता केसपेपरसाठी पाचऐवजी दहा रुपये मोजावे लागतील, तर अतिदक्षता विभागाचा एका दिवसाचा चार्ज ४०० रुपयांवरून एक हजार रुपयांवर नेला आहे. फिजोथेरपी सेंटरमध्ये एका वेळेस ५० ऐवजी १०० रुपये मोजावे लागणार आहेत.

कोरोना काळात या शुल्कवाढीच्या अंमलबजावणीस तात्पुरती स्थगिती दिली होती. मात्र, दोन दिवसापासून याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. याची झळ सर्वसामान्यांना बसणार आहे. महापालिकेची रुग्णालये सर्वसामान्यांना सेवा देत असतात. नागरिकांना अत्यल्प दरात सुविधा देणे हा या मागचा उद्देश असतो; पण अलिकडच्या काळात या सेवांचे दरही वाढत चालले आहेत. कोरोना महामारी आणि लॉकडाउनचा फटका सर्वसामान्यांच्या जीवनावर बसला आहे. त्यातच पुन्हा हे दर वाढल्याने आता सर्वसामान्यांची अर्थिक कोंडी होणार आहे. खासगी वैद्यकीय सेवांचा दर सर्वानाच परवडतो असे नाही. पूर्वी वॉर्ड दवाखाने नागरिकांसाठी आधारवड बनून राहायचे.

हेही वाचा- सावधान:  अल्पवयीन मुलांकडून अपघात झाल्यास पालकांना होणार शिक्षा

सावित्रीबाई फुले रुग्णालय, पंचगंगा रुग्णालय, आयसोलेशन ही प्रमूख रुग्णालये आहेत. अन्य खासगी वैद्यकीय सेवांच्या दृष्टीने दरवाढ फारशी नसली तरी खिशाला कात्री लावणारी मात्र निश्‍चित आहे. महापालिकेच्या दवाखान्यांना अलीकडे ‘अच्छे दिन आले आहेत. सावित्रीबाई फुले रुग्णालय तसेच आयसोलेशनमध्ये वर्दळ वाढली आहे. कोरोनाचे संकट कमी होत असताना दरवाढीची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

हेही वाचा- गडहिंग्लजला फळभाज्या, सोयाबीनचे दर तेजीत -

सेवा    जुना दर    नवा दर 
आर.ए. टेस्ट    ३०    ५०
बी.टी.ॲण्ड सी.टी    ३०    १००
एच. बी.    ३०    ५०
पॅफ स्मेअर    २५    १००
सेमेरी एक्‍झाम    ४५    ५०
स्टूल एक्‍झा    ३०    ५०
प्रेगन्सी टेस्ट    ४०    १००
कोलेस्ट्रॉल  एचओएल    ६०    १००
कोलेस्ट्रॉल एलडीएल    ७०    १००
बॉडी फ्युड तपासणी    ३०    १००
एस.जी.पी.टी एक्‍झा    ४०    १००
एस.जी.ओ.टी.एक्‍झा    ४०    १००
दात काढणे    ४०    ५०
दातात सिमेंट भरणे    ४०    १००
चांदी भरणे    ५०    १००
क्‍लेअरिंग करणे    ३५    १००
रक्‍त मागणी अर्ज    १०    २५
अतिदक्षता विभाग    ४००    १०००

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolhapur Municipal health services expensive Implementation continues kolhapur health news latest news