कोल्हापुरात कोरोना बाधितांच्या संख्येची पून्हा शंभरी पार 

शिवाजी यादव  
Tuesday, 19 January 2021

गेल्या दोन महिन्यात कोरोना सदृष्य लक्षणे असणाऱ्यांचे प्रमाणही कमी झाले

कोल्हापूर - गेल्या पंधरा दिवसात कोरोनाबाधितांची संख्या दिवस दोन ते पाचने वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांच्या संख्येने पून्हा एकदा शंभरी पार केली आहे. आज एका दिवसात 12 नवे कोरोनाबाधित सापडले आहेत तर पाच व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत त्यामुळे उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या 102 इतकी झाली आहे. तर एका कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. 

गेल्या दोन महिन्यात कोरोना सदृष्य लक्षणे असणाऱ्यांचे प्रमाणही कमी झाले. त्यामुळे स्वॅब तपासणीला येणाऱ्यांची संख्याही कमी झाली. तर कोरोनाबाधित येण्याचेही प्रमाण कमी झाले. त्यामुळे गेल्या वीस दिवसापूर्वी जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 34 पर्यंत खाली आली होती. त्यानंतर पून्हा दिवसात दोन ते पाच अशा वाढीव संख्येने बाधित सापडू लागले. तसेच कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाणही तेवढ्याच संख्येने कमी झाले. परिणामी उपचार घेणाऱ्यां कोरोनाबाधितांचा आकडा वाढून तो शंभरी पार झाला आहे. अशा स्थितीत आरोग्य विभाग अद्यापि दक्ष असून जिल्ह्यातील तालुकास्तरीय कोवीड सेंटरवर तपासणी व उपचार सेवा सुरू आहे. 

दरम्यान, सांगलीतील एक 80 वर्षीय कोरोनाबाधित पुरूष व्यक्तींचा सीपीआर मध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. त्यांना फुप्फुसाचा संसर्ग अन्य काही गंभीर आजारांची लक्षणे होती अशी माहिती सुत्रांनी दिली. 

हे पण वाचाहसता खेळता पोरगा रात्री झोपला अन् सकाळी उठताना तो बेशुध्द होता

 

  
एकूण कोरोना बाधित ः 49 हजार 780 
कोरोना मुक्त ः 47 हजार 965 
कोरोना मृत्यू ः 1 हजार 713 
उपचार घेणारे ः 102 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolhapur new corona cases