बेशुध्द अरमानला सीपीआरने दिले जीवदान 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 19 January 2021

अरमान बेशुध्द असल्याचे पाहून खेडच्या डॉक्‍टरांनी त्याला कोल्हापूराला जाण्याचा सल्ला दिला

कोल्हापूर -  खेड ( ता. रत्नागिरी) येथील चौदा वर्षिय अरमान महंमद चौगुले हसता खेळता पोरगा रात्री झोपला तर सकाळी उठताना तो बेशुध्द होता. पालक हवालदिल झाले. त्याला सीपीआरमध्ये आणले. तो कशामुळे बेशुध्द झाला त्याची कोणतीच माहिती नसल्याने सर्वच जण संभ्रमीत होते. अशात सीपीआरच्या औषधवैद्यक शास्त्र विभागाच्या डॉक्‍टरांनी अरमानला तपासले पण त्याची प्रकृती चिंताजनच होती. पुढे तीन दिवस उपचारांची शर्त करून अरमानला पून्हा चालते-बोलते करण्यात डॉक्‍टरांनी यश मिळविले. 

अरमान बेशुध्द असल्याचे पाहून खेडच्या डॉक्‍टरांनी त्याला कोल्हापूराला जाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार 108 रूग्णवाहिकेतून अरमानला कोल्हापूरातील सीपीआरमध्ये आणले येथे बंटी सावंत व नगरसेवक जंगेश पठाण यांनी पालकांना दिलासा देत सीपीआरमध्ये उपचार करण्यासाठी मदत केली. 
यात अरमान बेशुध्द होता, त्याच्या स्नायूची हालचाल मंद होती, त्याला तीव्र विष बाधा किंवा सर्पदंश झाल्याचा अंदाज होता. पण खात्रीने काहीच लक्षात येत नव्हते. तेव्हा डॉक्‍टरांना अरमान शरिराची तपासणी केली तेव्हा तळपायाला दोन खूणा जाणवल्या. त्यावरून सर्पदंशाने अरमान बेशुध्द झाल्याचे निदान करून त्या दिशेने ऍट्रापीन, नियोसिटगमीनचे उपचार सुरू केले. 

त्यानंतर अरमानच्या प्रकृतीत सुधारणा झाली. तीन दिवसांनी व्हेन्टीलेटर काढले. अरमान पून्हा चालू बोलू लागला. त्याला आज डिस्चार्ज देण्यात आला. 

हे पण वाचा - चिप्स खाल्याने रंकाळ्यातील पाणबदकांचा मृत्यू

विभाग प्रमुख डॉ. महेंद्र बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. गिरीश पाटील, डॉ. आशिष, डॉ. प्रविण, श्रीकृष्ण, डॉ. आस्था आदींनी उपचार केले. तर अरमानचे पालक निशामुद्दीन चौगुले, असरफ चौगुले यांचा सहयोग लाभला. 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolhapur cpr hospital