'मोबाईलवर फक्त एक फोटो काढा आणि पुढची कारवाई बघा'

kolhapur police action on Do not observe social distance
kolhapur police action on Do not observe social distance
Updated on

कोल्हापूर : जे कोणी तोंडावर मास्क लावत नाहीत. व्यवसायाच्या ठिकाणी हॅंडग्लोव्हज घालत नाहीत किंवा सोशल डिस्टन्स पाळत नाहीत, त्यांचा फक्त मोबाईलवर एक फोटो काढा आणि मग पुढची कारवाई बघा, या आवाहनाचा चांगलाच धसका शहरात जाणवत आहे. एखाद्या दुकानात, बेकरीत, भाजी मंडईत, उद्योग व्यवसायाच्या ठिकाणी मास्क न लावलेली व्यक्ती दिसली व त्या व्यक्तीचा फोटो महापालिका, पोलिसांकडे पाठवला, तर त्यावर कारवाई सुरू झाली आहे. फोटो पाठवणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्याची हमी पोलिसांनी घेतली आहे. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी त्यांच्या पातळीवर फोटो काढत कारवाई सुरू केलीही आहे. 

महापालिका व पोलिसांनी संयुक्तपणे "कोरोना योद्धा' या नावाखाली ही मोहीम सुरू आहे. कोरोना संसर्ग खबरदारीचा भंग प्रशासनाच्या नजरेस फोटोद्वारे आणून देणाऱ्यास किंवा जनजागृती करणाऱ्यास कोरोना योद्धा असे संबोधले जाणार आहे. तुम्ही एखाद्या दुकानात खरेदीसाठी गेलात आणि त्या दुकानदाराच्या वा नोकराच्या तोंडावर मास्क नाही, हे लक्षात आले की, तुम्ही मोबाईलवर नकळत फोटो काढायचा. तो 7218038585 या व्हॉटस्‌ ऍपवर पाठवायचा. हा नंबर पोलिस नियंत्रण कक्षाचा आहे. फोटोसोबत फोटो कोठे काढला ते ठिकाण, वेळ व तारीख याचा उल्लेख आवश्‍यक. महापालिका फोटोच्या आधारे किंवा त्या फोटोचा पुरावा घेऊन कारवाई करणार आहे. मास्क न लावता मालक किंवा त्याचे कर्मचारी असतील, तर 500 रुपये दंड वसूल करण्यात येणार आहे. दोन वेळा एकच व्यक्ती किंवा त्याचे दुकान कारवाईत सापडले, तर फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे. 

प्रत्येकाच्या तोंडावर मास्क व खाद्य पदार्थांशी संबंधित व्यवसायाच्या ठिकाणी हॅंडग्लोव्हज आवश्‍यक आहे. बहुतेक जण त्याचा वापर करत आहेत; पण काही जण जमेल तसे या पद्धतीने वापर करत आहेत. त्यामुळे संसर्ग पसरण्याचा धोका कायम आहे. त्यामुळे जो उपाय योजनांचे पालन करत नाही, त्याच्यावर कारवाई अटळच आहे. 

कोरोना संसर्ग रोखणे ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नाही. ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. लॉकडाउन शिथिल केले याचा अर्थ कोरोना गेला असा नाही. तो आपल्या आसपासच आहे. त्यामुळे त्याला रोखण्यासाठी नागरिकांनीच सजग राहावे. जे कोणी खरबदारी घेत नाहीत, त्यांच्यावर कारवाई होईल. 
- डॉ. अभिनव देशमुख, पोलिस अधीक्षक 

स्वत: मी देखील जेथे मला सोशल डिस्टन्सचा भंग दिसेल तिथले फोटो मी काढतो. नंतर तेथे कारवाई होते. कोरोना संसर्ग टाळणे ही सर्वांची जबाबदारी आहे. ती पाळलीच पाहिजे. 
- डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, आयुक्त, महारपालिका 

कोल्हापुरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com