तोतया सीआयडी इन्स्पेकटर युवतीने अनेकांना घातला लाखो रूपयांचा गंडा पण...

kolhapur police arrested to duplicate cid inspector women
kolhapur police arrested to duplicate cid inspector women

कोल्हापूर - गारगोटी शहरात सीआयडी इन्स्पेकटर असल्याचा रुबाब दाखवून पोलिस खात्यात नोकरी लावतो अशी बतावणी करून लाखो रुपयाचा गंडा घालणाऱ्या तोतया सीआयडी इन्स्पेकटर युवतीसह तिच्या मामाला पोलिसांनी गजाआड केले. प्रियंका प्रकाश चव्हाण (वय 22 वर्ष रा.गारगोटी ( खडकगल्ली ) आणि मामा विठ्ठल मारुती निलवर्ण (वय 38) अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत.  


याबाबत अधिक माहीत, या मामा-भाचीने भुदरगड तालुक्यातील अनेक युवक, युवतींना नोकरी लावतो म्हणून लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. यामुळे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. दोन वर्षापूर्वी गारगोटी शहरात जोतिबा चौकात या तरुणीचे पोलीस खात्यात नोकरी लागल्याचे डिजिटल बोर्ड लागले होते. या माध्यमातून तिने आपण सीआयडी इंनस्पेक्त्तर असल्याची  प्रतिमा तयार  केली. त्यामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी तिचे सत्कारही झाले होते. तिच्या या भुलथापांवर लोकांचा विश्वास बसला. यातूनच पोलिस खात्यात नोकरी लावतो म्हणून पैसे उकळण्याचा धंदा सुरू करून लाखो रुपये जमा केले आहेत. 

25 जुलै रोजी भुदरगड तालुक्यातील निळपण येथील प्रतीक्षा साळवी हिच्याकडून प्रियांका आणि तिचा मामा विठ्ठल यांनी दहावी बारावी प्रमामपत्र, शाळा सोडल्याचा दाखला याच्या झेरॉक्स तसेच 5 लाख 25 हजार रुपये घेऊन सीआयडी विभागाचे बनावट ओळख पत्र दिले. याबाबत भुदरगड पोलिस ठाण्यात प्रतीक्षा हिने फिर्याद दिली असून याप्रकरणी प्रियांका व तिचा मामा विठल निलवर्ण यांना ताब्यात घेतले आहे.


संपादन- धनाजी सुर्वे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com