Big Breaking-कोल्हापुरात महिलांच्या आंदर-बाहर जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 जुलै 2020

शहरात पहिल्यांदाच महिलांचा जुगार अड्डा उघडकीस आल्याने तो चर्चेचा विषय बनला आहे. 

कोल्हापूर - आजपर्यंत पुरूषांचा जुगार अड्डा माहित होता पण आज टेंबलाई नाका परिसरातील झोपडपट्टीत चक्क महिलांच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून जुगार खेळणाऱ्या पाच महिलांसह अड्डामालक महिला व दोन युवक अशा आठ जणांना अटक केली. या घटनेने या परिसरात खळबळ उडाली आहे. 
या छाप्यात रोख सहा हजार रूपयांसह दोन मोबाईल, जुगाराचे साहित्य असा 14 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. शहरात पहिल्यांदाच महिलांचा जुगार अड्डा उघडकीस आल्याने तो चर्चेचा विषय बनला आहे. 

या प्रकरणी अड्डा मालक शोभा संजय हेगडे (रा. झेंडा चौक, कागल), निलम विजय कांबळे (रा. मणेर मळा, उचगांव), वर्षा इकबाल लोंढे (वय 30), दिपाली आकाश लोंढे (वय 20, दोहीही रा. टाकाळा झोपडपट्टी), भिंगरी अविनाश सकट (वय 40, रा. राजेंद्रनगर झोपडपट्टी), सुरेखा राजू नरंदेकर (वय 37, टेंबलाई नाका), सुनील संभाजी घोडके (वय 38, रा. घोडके चाळ, टेंबलाई नाका), करीम मोहिद्दीन खान (वय 38, रा. ओमसाई पार्क, उचगांव) अशी अटक केलेल्यांची नांवे आहेत. 

हे पण वाचा - कोल्हापूरात लॉकडाऊन नाही : पालकमंत्री सतेज पाटील 

टेंबलाई नाका परिसरातील झोपडपट्टीत महिलांचा आंदर-बाहर जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक नवनाथ घुगरे यांच्या नेतृत्त्वाखाली पथकाने या अड्ड्यावर छापा टाकून ही कारवाई केली. यापुर्वी दारू अड्डा, मटका अड्डा चालवणाऱ्या महिलांना अटक झाली आहे. पण महिलांच्या जुगार अड्ड्यावरील ही जिल्ह्यातील पहिलीच कारवाई आहे. 
 
संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolhapur police read on women jugaad please