आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी रेंदाळचा पत्रकार गजाआड 

kolhapur Rendals journalist arrested offensive post case
kolhapur Rendals journalist arrested offensive post case

हुपरी : थोर महापुरुषांसंदर्भात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल झाल्या प्रकरणी ग्रुपचा ऍडमिन असलेल्या रेंदाळ येथील तथाकथित पत्रकारास हुपरी पोलिसांनी गजाआड केले.

कुरूंदवाड येथून प्रसारित होणाऱ्या एका यु ट्यूब न्युज चॅनलच्या रेंदाळ येथील प्रतिनिधीने चॅनलच्या नावावर व्हॉटस अप ग्रुप तयार करून त्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते. ग्रुपमध्ये काल (ता. 4) सायंकाळी एकाने वादग्रस्त पोस्ट टाकल्याची बाब व्हायरल झाली. त्यामुळे कुरूंदवाड येथे प्रतिक्रिया उमटू लागल्या. 

ही माहिती मिळताच हुपरी पोलिसांनी संबंधित ग्रुप ऍडमिनला काल (ता. 4) अटक केली. पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के, उपनिरीक्षक विजय मस्कर, पल्लवी यादव यांनी स्थितीवर वेळीच नियंत्रण मिळविले. 

दरम्यान, पोलिस उपअधीक्षक बी. बी. महामुनी यांनी येथे भेट देऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली. एसआयटीचे वरिष्ठ पोलिस अधिकारी राजेंद्र तोडकर यांनीही भेट दिली. दरम्यान, शहरात पोलीस बंदोबस्त कायम होता. 

कुरुंदवाडमध्ये निषेध फेरी 
कुरुंदवाड ः घटनेच्या निषेधार्थ येथे कडकडीत बंद पाळला. आज सकाळी सर्व दलित संघटनांचे कार्यकर्ते आंबेडकर पुतळ्याजवळ जमा झाले. त्यावेळी मोठ्या प्रमाणात निषेधाच्या घोषणा दिल्या. भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामदास मधाळे व पश्‍चिम महाराष्ट्राचे संघटक गौतम ढाले, नगरसेवक उदय डांगे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून शहरातून निषेध फेरी काढली. अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस निरीक्षक चंद्रकांत निरावडे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त तैनात होता. 


संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com