कोल्हापूर: दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळक्याकडील पिस्तुलाबाबत चौकशी सुरू 

राजेश मोरे 
Friday, 5 March 2021

सायबर चौक परिसरात मंगळवारी रात्री राजारामपुरी पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या पाच जणांना अटक केली

कोल्हापूर - दरोड्याच्या प्रयत्नात असणाऱ्या पाच जणांच्या टोळीला राजारामपुरी पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडे सापडलेल्या गावठी पिस्तूलासह जीवंत काडतुसाबाबत चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

सायबर चौक परिसरात मंगळवारी रात्री राजारामपुरी पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या पाच जणांना अटक केली. अजिंक्‍य भोपळे, जयवंत साळवे, दीपक आडगळे, अनिल वायदंडे, वैभव हजारे अशी त्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी गावठी पिस्तूल, मॅग्निझन, चार जीवंत काडतुसे, दोरी, दोन तलवारी, मोबाईल, मोटार असा सुमारे आठ लाखांचा मुद्देमाल जप्त केला होता.

त्या सर्व संशयितांना न्यायालयाने 6 मार्च पर्यंत कोठडी सुनावली. आज पोलिसांनी त्याच्याकडून जप्त केलेल्या पिस्तुलाची व जीवंत काडतुसाबाबत चौकशी सुरू केली. ही पिस्तूल कोठून खरेदी केली, त्याचा यापूर्वी वापर करण्यात आला होता का? यासह जप्त केलेल्या मोबाईल आधारे तपासाच्या अनुषंगाने अन्य माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे उपनिरीक्षक समाधान घुगे यांनी सांगितले. 

  संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolhapur robbery pistol crime news