kolhapur shivsena protest devendra fadnavis
kolhapur shivsena protest devendra fadnavis

अन्यथा कोल्हापुरात पाय ठेवू देणार नाही शिवसेनेचा 'फडणवीस' यांना इशारा...

Published on

कोल्हापूर - राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजर्षी छत्रपती शाहूप्रेमी आणि महाराष्ट्राची माफी मागावी. अन्यथा त्यांना कोल्हापुरात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा आज शिवसेनेने दिला. श्री.फडणवीस यांनी काल राजर्षी शाहूंच्या स्मृतीदिनी ट्विटरवर सामाजिक कार्यकर्ते असा उल्लेख केला होता. ही गोष्ट लक्षात येताच शाहूप्रेमींतून संताप व्यक्त होवू लागला आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेनेने आज राजर्षी शाहू समाधीस्थळ येथे निदर्शने केली आणि फडणवीस यांचा निषेध नोंदवला.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे म्हणाले, "राजर्षी शाहूंचे कार्य केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात पोचले आहे. फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहिला आहे. मात्र, तरीही त्यांना राजर्षी शाहू कळले नाहीत का? त्यांनी घडलेल्या प्रकाराबाबत तत्काळ माफी मागितली पाहिजे.'' दरम्यान, जिल्हाप्रमुख संजय पवार, देवस्थान समितीचे सदस्य शिवाजीराव जाधव, सुजीत चव्हाण आदी यावेळी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com