esakal | बंधाऱ्यांचा भराव उद्‌घाटनापूर्वीच गेला वाहून
sakal

बोलून बातमी शोधा

The Kolhapur-Style Embankment's Filler Was Carried Away With Rain Kolhapur Marathi News

हिरण्यकेशी नदीवरील नांगनूर-संकेश्‍वर दरम्यान असलेल्या जुना बंधारा जीर्ण झाल्यामुळे कर्नाटक सरकारने जुन्या बंधारालगत समांतर दोन फूट अधिक उंचीचा नवा बंधारा बांधला आहे.

बंधाऱ्यांचा भराव उद्‌घाटनापूर्वीच गेला वाहून

sakal_logo
By
विठ्ठल चौगुले

नूल : हिरण्यकेशी नदीवरील नांगनूर-संकेश्‍वर दरम्यान असलेल्या जुना बंधारा जीर्ण झाल्यामुळे कर्नाटक सरकारने जुन्या बंधारालगत समांतर दोन फूट अधिक उंचीचा नवा बंधारा बांधला. या बंधाऱ्याची वापरापूर्वी दुरवस्था झाली आहे. परंतु, उद्‌घाटनापूर्वीच या बंधाऱ्यांची दुरवस्था झाली आहे. महापुरात व पावसाळ्यात नव्या बंधाऱ्याचा दोन्ही बाजूचा भराव वाहून गेला. 

सुमारे चार दशकांपूर्वी कर्नाटक सरकारने हिरण्यकेशी नदीवर नांगनूरजवळ कोल्हापूर पद्धतीचा नवीन बंधारा बांधला होता. याला गोटूर बंधारा म्हणून ही ओळखले जाते. सध्या हा बंधारा जीर्ण होऊन कमकुवत झाला होता. त्याला पर्यायी व्यवस्था म्हणून दोन वर्षांपूर्वी त्याच्या बाजूला कोट्यवधी रुपये खर्च करून नवीन बंधाऱ्यांची उभारणी केली. परंतु, उद्‌घटनापूर्वीच या बंधाऱ्यांची दुरवस्था झाली आहे. महापुरात व पावसाळ्यात नव्या बंधाऱ्याचा दोन्ही बाजूचा भराव वाहून गेला. 

बंधाऱ्याचे अनेक गार्ड स्टोन फुटले आहेत. गार्ड स्टोनमध्ये संरक्षणासाठी बसविलेल्या लोखंडी पाइप वाकल्या आहेत. काही पाईप्स गायब झाल्या आहेत. पावसामुळे भराव वाहून गेलेल्या ठिकाणी प्रशासनाने दगड टाकले आहेत. त्यामुळे या बंधाऱ्यावरून वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. सध्या जीर्ण झालेल्या जुन्या बंधाऱ्यावरूनच वाहतूक सुरू आहे. 

संपादन - सचिन चराटी 

go to top