कोल्हापुरी गुळाच्या गोडव्याची परदेशात मागणी

kolhapuri jaggery product demand by foreign country without sugarless jaggery from kolhapur
kolhapuri jaggery product demand by foreign country without sugarless jaggery from kolhapur

कोल्हापूर : परदेशी बाजारपेठेतून कोल्हापुरी गुळाला यंदा मागणी होती; मात्र कोल्हापुरी गूळ शिल्लक नव्हता यासाठी कर्नाटकी गूळ परदेशात पाठविला. त्यात साखरेचे प्रमाण जास्त आढळल्याने तो गूळ नाकारला गेला. त्यातून अडीच कोटींच्या उलाढालीला फटका बसला. यंदा नवा गूळ हंगाम सुरू झाला आहे, यात कोल्हापुरी शुद्ध गुळाला परदेशातून चांगली मागणी होत आहे. साखर विरहित गुळाचा आग्रह निर्यातदारांकडून वाढला आहे.

कोल्हापुरी गुळांची ख्याती देशभर आहे. कोल्हापुरातील ८० टक्के गूळ गुजरातमध्ये जातो मात्र गेल्या १० वर्षांत कोल्हापुरात गुऱ्हाळे कमी झाली. गूळ उत्पादन कमी झाले तर कर्नाटक सीमा भागात गुऱ्हाळघरांची संख्या व गूळ निर्मिती वाढली. तेथे स्वस्तातील गूळ मिळू लागला आणि तोच गूळ कोल्हापुरी गूळ म्हणून गुजरातमध्ये पाठवला जाऊ लागला. त्याला दर चांगला मिळू लागला.  परदेशातही कोल्हापुरी गुळाला मागणी असते, यंदा लॉकडाउन काळात दोन कंटेनर गूळ आखाती देशात पाठवण्याची तयारी झाली; मात्र त्या गुळात साखरेचे प्रमाणात जास्त आढळल्याने तो गूळ निर्यातदारांनी नाकारला. परिणामी जवळपास अडीच कोटींचे नुकसान झाले.  

गेल्या महिन्याभरात कोल्हापुरी गुळाला इंग्लड, अमेरिका, आखाती देशातून मागणी होत आहे. दर चांगला मिळणार आहे. मात्र मागील अनुभव पाहता साखर विरहित गूळ निर्मितीवर भर द्यावा लागेल तरच नफा मिळण्याची शक्‍यता निर्यातदार व्यक्त करत आहेत. त्यानुसार कोल्हापुरातील मोजक्‍या गुऱ्हाळ घर चालकांकडून शुद्ध कोल्हापुरी गुळाच्या ऑर्डर देणे सुरू झाले आहे. या महिनाअखेरीस परदेशातील बाजारपेठेत गूळ पाठविला जाणार असल्याचे निर्यातदारांकडून सांगण्यात आले.   

"कर्नाटकी गूळ पाच वेगवेगळ्या वेळेत काढलेल्या आदणात एकसारख्या गुणवत्तेचा तयार होतो. कोल्हापुरात अलीकडच्या काळात प्रत्येक आदणाच्या गुळाची गुणवत्ता वेगवेगळी असल्याने दर ठरविताना अडचणी येतात. त्यामुळे गुणवत्तापूर्ण गूळ बनविणे आवश्‍यक आहे."

- डॉ. मोहन पाटील, कृषी विपणन, मार्गदर्शक    

"कोल्हापुरी गुळाला परदेशात मागणी आहे. विशेषतः आखाती देशात यंदा गूळ जास्त प्रमाणात जाण्याची शक्‍यता आहे. त्याची तयारी करत आहोत. यंदा ऊस उत्पादन चांगले असल्याने गूळ निर्मितीही चांगली होईल. यंदा निर्यात वाढण्याची शक्‍यता तसेच शेतकऱ्यांना नफा मिळणार आहे."

 - निमेश वेद, निर्यातदार

दृिष्टक्षेपात

- सध्या सुरू गुऱ्हाळ घरे : २२५ 
- एकूण गूळ निर्मिती : ३८ लाख रवे
- परदेशात जाणारा गूळ सरासरी : १२ लाख रवे 
- वार्षिक उलाढाल : २५० ते २७० कोटी 
- परदेशी गूळ उलाढाल : ३० ते ४० कोटी 
- गुळाचा यंदाचा दर :३२०० ते ४५०० रुपये क्विंटल

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com