कोल्हापूरच्या निखिलचे कोलकत्यात लक्षवेधी गोल

दीपक कुपन्नावर
Thursday, 21 January 2021

कोलकत्यात सुरू असणाऱ्या इंडियन फुटबॉल लिग (आय लिग) स्पर्धेत कोल्हापूरच्या निखिल कदमने उत्कृष्ट हेडव्दारे गोल नोंदविला.

गडहिंग्लज : कोलकत्यात सुरू असणाऱ्या इंडियन फुटबॉल लिग (आय लिग) स्पर्धेत कोल्हापूरच्या निखिल कदमने उत्कृष्ट हेडव्दारे गोल नोंदविला. मणिपूरच्या टिडिम रोड अँथलेटिक युनियन (ट्राऊ) एफसी विरूध्द हा त्याने लक्षवेधी गोल केला.

निखिल यंदा कोलकत्ताच्या बलाढ्य मोहामेडन स्पोर्टिंग संघाकडून खेळतो आहे. या गोलने उत्साह दुणावलेल्या मोहामेडनने पिछाडीवरून पुढे येत 2-2 अशी बरोबरी साधुन महत्वपुर्ण एक गुण मिळविला. गुण तक्‍यातत दुसरे स्थान मिळविले. यंदाच्या हंगामातील त्याचा हा पहिलाच गोल आहे. 

महत्वाच्या सामन्यात मोहामेडन संघ मध्यतंरापर्यंत अनपेक्षितपणे 2-0 असा पिछाडीवर होता. ट्राऊ एफसीने सामन्याच्या 2 आणि 47 व्या मिनिटाला सनसनाटी गोल करून धक्का दिला. गोल फेडण्यासाठी निखिलने एकापाठोपाठ चढायांचा धडाका लावला. त्यातुनच मोहामेडन संघाला कॉर्नर मिळाला.

या वेळी मोहामेडनच्या तिर्थनकर सरकारने मारलेली कॉर्नर किक ट्राऊच्या बचावपटूंना दुर न करता आल्याने चेंडू गोलक्षेत्रातच रेंगाळला. याचवेळी तिथे असणाऱ्या निखिलने थेट जमिनिशी लोळण घेत चेंडूला हेडने गोलजाळ्यात धाडत सामन्याची रंगत 2-1 अशी वाढविली. या गोलने आत्मविश्‍वास दुणावलेल्या मोहामेडन संघाने 68 मिनिटाला हिरा मोंडलच्या हेडरने दुसरा गोल करीत बरोबरी साधली. यापुर्वी निखिलने पुणे एफसी आणि मुंबई एफसी कडून आय लिगमध्ये गोल केले आहेत. 

 

संपादन - सचिन चराटी

kolhapur


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur's Nikhil Scores A Spectacular Goal In Kolkata Kolhapur Marathi News