सहा महिन्यांनी कोयना एक्‍सप्रेस रूळावर : पण महालक्ष्मीची प्रतीक्षा

Koyna Express Six months later  the train left for Mumbai From Rajarshi Shahu Maharaj Terminals
Koyna Express Six months later the train left for Mumbai From Rajarshi Shahu Maharaj Terminals
Updated on

कोल्हापूर : "कोयना एक्‍सप्रेस'च्या वेळेतच आज सकाळी आठ वाजून पाच मिनिटांनी मुंबईकडे विशेष रेल्वेगाडी रवाना झाली. तब्बल सहा महिन्यांनी ही गाडी मुंबईला रवाना झाली असली तरीही "महालक्ष्मी एक्‍सप्रेस' केंव्हा सुरू होते याकडे प्रवाशांचे डोळे लागून आहेत. कोरोना महामारीत सर्व नियमित गाड्या रद्द केल्या असून सध्या सुटत असलेल्या गाड्यांच्या वेळा आणि मार्ग एकच असले तरीही त्या "विशेष' गाड्या म्हणूनच सोडल्या जात आहेत. 


दरम्यान आज सकाळी कोयना एक्‍सप्रेसच्या वेळेत सुटलेल्या गाडीतून 25 तर "महाराष्ट्र एक्‍सप्रेस'च्या वेळेत सुटलेल्या गोंदिया गाडीतून 36 प्रवासी येथील राजर्षी शाहू महाराज टर्मिनल्स मधून रवाना झाले. सध्या सुटत असलेल्या रेल्वेगाडीतून केवळ बुकींग असलेल्या प्रवाशांनाच परवानगी आहे. अनलॉक पाच मध्ये काही अटीनेच या रेल्वेगाड्या सुरू झाल्या आहेत.

कोल्हापुरातून मुंबईला जाण्यासाठी सर्वाधिक मागणी महालक्ष्मी एक्‍सप्रेसला आहे. ती तातडीने सुरू झाल्यास प्रवाशांची संख्या आणखी वाढण्याची शक्‍यता प्रवासी आणि स्थानकावरून वर्तविली जात आहे. साधारण आठवड्यात महालक्ष्मी एक्‍सप्रेसच्या वेळेत विशेष गाडी सोडण्याची शक्‍यता ही स्थानकावरून वर्तविली जात आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतेही आदेश नाहीत. 

 संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com