ढगफुटी सदृशने पावसाने कोल्हापूर जिल्ह्यात भरली धडकी

0
0

कोल्हापूर : विजांचा कडकडाट, ढगांच्या गडगडाटासह जिल्ह्यात ठिकठिकाणी ढगफुटीसदृश पावसाने मंगळवारी सायंकाळनंतर धडकी भरवली. ओढे-नाले, गटर, गल्लीसह शहरातील मोठ्या इमारतींचे पार्किंग पाण्याने तुडुंब भरले. कोल्हापूर शहरात घराघरांत अचानक पाणी शिरल्याने प्रापंचिक साहित्य इतरत्र हलवण्याआधीच भिजून गेले. सायंकाळनंतर तब्बल दीड तास पाऊस झाला. त्यानंतर रात्री साडेनऊनंतर पुन्हा पावसाने झोडपायला सुरुवात केली. तो सुमारे तासभर कोसळला. त्यानंतर रात्री साडेअकरानंतर पावसाने पुन्हा बेफाम कोसळणे सुरू ठेवले. 

पन्हाळा, शाहूवाडी, करवीर तालुक्‍यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. ग्रामीण व शहरातील प्रत्येक गल्लीतील पाणी एखाद्या ओढ्याप्रमाणे वाहत राहिल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले. यातच वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांच्या भीतीत आणखी भर पडली. तर, ग्रामीण भागात ऊस, भात, भुईमूग, सोयाबीन पिके भुईसपाट झाले आहेत. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने शनिवारपर्यंत (ता. 12) वादळी वारे आणि जोरदार पावसाची शक्‍यता वर्तवली आहे. 

जिल्ह्यात सकाळी धुके, दुपारी उकाडा आणि रात्री ढगफुटीसदृश पावसाने दैना उडवली. ढगफुटी सदृश झालेल्या पावसामुळे ऊस, भात, भुईमूग आणि सोयाबीनचे मोठे नुकसान झाले. परिपक्व होत असलेले भात आणि सोयाबीन जमीनदोस्त झाले आहे. अनेक शिवारात भाताच्या लोंब्या आणि सोयाबीनच्या शेंगा पावसाच्या माऱ्याने तुटून पडल्या आहेत.

जिल्ह्यात दुपारपासूनच ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली. निम्या गावात अतिवृष्टी तर निम्या गावात पाऊस नाही, असे चित्र पाहयला मिळाले. कोल्हापूर शहरातही रामानंदनगर येथे ढगफुटीसदृश्‍य पाऊस झाला. त्याचवेळी उद्यमनगर, मंगळवार पेठ, दसरा चौक किंवा इतर ठिकाणी पावसाचा थेंबही नव्हता. पण, रामानंदनगर येथे झालेल्या पावसाच्या पाण्यामुळे जयंती नाला बघता-बघता दूथडी भरून वाहू लागला. हे पाणी कुंभारवाड्यातील अनेक घरांमध्ये शिरल्याने लोकांची धावपळ सुरु झाली. हिच परिस्थिती इतर ठिकाणी राहिली. पाचगाव येथे तुफानी पावसाने उंचावरील घरातही पाणी शिरले. वटवृक्ष कॉलनीतील एका घरात शिरलेले पाणी बाहेर काढण्यासाठी भिंत फोडण्याची वेळ आली. 
जिल्ह्यात यावर्षीच पिंकाची स्थिती चांगली आहे. वाढ चांगली आहे; मात्र आजच्या पावसामुळे ऊसासह इतर पिकांनी शेतातच लोळण घेतली आहे. हातातोडाला आलेली पिक पाहून शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. पावसाने उंसत घेतल्याने शेतकऱ्यांनी रात्री उशीराचा भात, ऊस शेती गाठली; पण सर्वच चित्र धडकी भरवणारे आहे. 

काय झाले पावसाने

  • जिल्ह्यात सकाळी धुके, दुपारी उकाडा आणि रात्री ढगफुटी सदृश्‍य पाऊस
  • शहरातील रस्त्यांचे ओढे 
  • घराघरांत शिरले पाणी, नागरिकांमध्ये धडकी 
  • प्रापंचिक साहित्य पाण्यात, लाखो रुपयांचे नुकसान 
  • भुईमूग पाण्यात; ऊस, भात, सोयाबिन जमीनदोस्त                                          रस्ते, गल्ल्यांचे झाले ओढे 
  • रामानंदनगर येथे ढगफुटीसदृश्‍य पाऊस 
  • पन्हाळा, शाहूवाडी, करवीर तालुक्‍यात सर्वाधिक पाऊस
  •  

कोठे शिरले होते पाणी

  • शाहूपुरी कुंभार गल्लीत अनेक घरात पाण्याचा शिरकाव 
  • रामानंदनगरच्या ओढ्यालगतच्या सात गल्लीत पाणी 
  • श्रीकृष्ण कॉलनीत प्रापंचिक साहित्य पाण्यात 
  • देवकर पाणंदीच्या चौकाला तळ्याचे स्वरूप 
  • तुळजाभवनीा कॉलनी रस्त्यावर अडीच फूट पाणी 
  • वीज पुरवठा खंडित झाल्याने देवकर पाणंद, सुर्वेनगरसह निम्मे शहर अंधारात 
  • पाणी पाहण्यासाठी लोकांची गर्दी 
  • लक्षतीर्थ वसाहत रस्त्यावर गुडघाभर पाणी 
  • परीख पुलाखाली होते पाच फूट पाणी 
  • फांद्या तुटल्या, वीज पुरवठाही झाला होता खंडीत 

कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यावर दोनवडे, कुडित्रे, कळंबा गावा दरम्यान चार ते पाच मोठ्या फांद्या तुटून पडल्या आहेत. राधानगरी रस्त्यावरही पुईखडी दरम्यानही फांद्या तुटून पडल्या आहेत. पावसामुळे शहरासह ग्रामीण भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे, रामानंदनगर, कुंभार गल्ली, सुतारवाडा येथे लोकांना प्रापंचिक साहित्य घरात शिरलेल्या पाण्यापासून वाचविताना अनेक अडचणी आल्या. 

संपादन ः विजय वेदपाठक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com