माणसाला माणुस बनवायचं सुत्र भारतीय राज्यघटनेचं : प्रा.डॉ.प्रकाश पवार

Lecture organized by Yin at Koparde Lecture Prof. Dr. Prakash Pawar kolhapur marathi news latest news
Lecture organized by Yin at Koparde Lecture Prof. Dr. Prakash Pawar kolhapur marathi news latest news

कोपोर्डे (कोल्हापूर)  : घटना समजुन घेणे ही युवकांची खरी गरज आहे. भारतीय राज्यघटनेचा अर्थ लावताना राज्यघटनेत भारत हा शब्द कसा पुढे आला हे युवकांनी पाहावं.राज्यकर्ता हा जनतेशी जबाबदार आहे हा मुळ आशय भारतीय राज्यघटनेचा आहे. राज्यघटेनेने प्रकृती ऐवजी संस्कृती स्विकारली आहे.दुबळ्यांना हक्क देण्याचं मुख्य सुत्र भारताच्या राज्यघटनेचे आहे.पाश्चिमात्य राज्यघटेनेची फक्त मदत घेवुन आपण परंपरा,संस्कृतीचा अर्थ लावून राज्यघटना तयार झाली आहे.असे प्रतिपादन जेष्ठ राजकिय विश्लेषक प्रा.डॉ.प्रकाश पवार यांनी केले.युवकांनी संविधानातून काय शिकले पाहिजे, या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी 'यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' (यिन) तर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त कोपार्डे येथील स. ब. खाडे महाविद्यालय येथे आयोजीत व्याख्यानात ते बोलत होते.

डॉ.पवार पुढे मार्गदर्शन करताना म्हणाले,भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सर्वांच्या इच्छांचा सार काढुन स्वातंत्र्य,समता,बंधुता हे सुत्र कायम करुन राज्यघटनेची निर्मिती झाली.घटनेनं माणसाला माणुस बनवण्याचे तत्व स्विकारलं.घटनेतील कलमे विवेक बुद्धीने,तारतम्याने समजुन घेण्याचा संकल्प युवकांनी करावा.राज्यघटना समजुन घ्यायला सुरवात होईल तेव्हाच युवकांची माणुस बनण्याची खरी सुरवात होईल.सकाळचा हा उपक्रम युवकांना घटना सजवून घेण्यासाठी महत्वाचा ठरेल.असे ही गौरवोद्गार काढत सकाळच्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.डी.डी.कुरळपकर होते.ते म्हणाले,भारताची राज्यघटना जगात महत्त्वाची मानली जाते.आपल्या घटनेचे लवचीकता हे प्रमुख वैशिष्ट्ये आहे.
यावेळी उपप्राचार्य प्रा.बी.एम.कुंभार,राष्ट्रीय सेवा योजना प्रकल्प अधिकारी प्रा.डी.बी.माने,प्रा.डाॅ.सौ.एस.के.पाटील, प्रा.व्ही.एम.सुर्यवंशी आदी शिक्षक व महाविद्यालयीन तरुण तरुणी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे संयोजन सकाळ 'यिन'चे समन्वयक अवधूत गायकवाड यांनी केले होते.

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com