जोतिबाच्या डोंगरावर नागझरी परिसरात दोन बछड्यांसह बिबट्याचा वावर 

Leopard two calves on jyotiba hills
Leopard two calves on jyotiba hills

जोतिबा डोंगर - श्रीक्षेत्र जोतिबा डोंगर (ता. पन्हाळा) येथील नागझरी भागात गेल्या दोन-तीन दिवसांपासून दोन बछड्यांसह मादी बिबट्याचा वावर आहे. या बिबट्याचे दर्शन जोतिबा वरील गुंडा मिटके यांना झाले. ते या भागात गेले असता अगदी जवळून हे बिबटे पाहीले आहेत. त्यांनीच याबाबतची माहीती गावात दिली. सकाळच्या कोवळ्या उन्हात हे बिबटे दगडावर बसतात. हे काही ग्रामस्थांनी पाहीले आहे. त्यामुळे त्याचा वावर आहे सिद्ध झाले आहे. त्यामुळे या भागातील वातावरण भयभीत झाले आहे.


दरम्यान , या ठिकाणी गवत कापणी, शेतीची कामे करताना ग्रामस्थांना भय निर्माण झाल्यामुळे एकटा कोणी रानात जात नाही. शेतकरी गटागटाने शेतात जातात.

वीज कडा हा परिसर ज्योतिबा बसस्थानकाच्या खाली असणाऱ्या खोल दरी व डोंगर पठार असा आहे. पूर्वी या ठिकाणी वीज पडली होती. त्या खुणाही या परिसरात एका दगडांमध्ये पाहण्यास मिळतात. म्हणून हा परिसर वीज कडा नावाने ओळखला जातो. या ठिकाणी ही  गेल्या सात-आठ वर्षांपूर्वी या  भागात दोन बिबट्यांचा वावर सुमारे महिनाभर होता. त्यानंतर ते दिसलीच नाहीत. तब्बल सात आठ वर्षांनंतर गेल्या महिन्यात हा बिबट्या निदर्शनास आला होता. त्याचा गिरोली सादळे मादळे कासारवाडी घाट या भागात वावर होता. तो पूर्ण वाढ झालेला आहे असे ग्रामस्थ सांगत होते. या ठिकाणी बिबटयास पोषक असे वातावरण असून या ठिकाणी मोठ मोठे दगड तसेच गुहा आहे. भरपूर झाडेझुडपे व काही ठिकाणी बिबट्यास पाणी पिण्यासाठी पाण्याचे झरे ही आढळतात त्यामुळे या ठिकाणी त्याचा वावर आहे. सध्या तर जोतिबा मंदिराच्या हाकेच्या अंतरावर या मादी बिबटयाचा वावर आहे. डोंगरावरील ग्रामस्थ व शेतकरी भयभीत झाले आहेत. 

संपादन - धनाजी सुर्वे 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com