'दिवाळीपूर्वी कोल्हापुरातील रस्ते खड्डेमुक्त करू' 

lets clear the roads in kolhapur before diwali say satej patil
lets clear the roads in kolhapur before diwali say satej patil

कोल्हापूर - कोल्हापूर शहरातील सर्व रस्ते दिवाळीपूर्वी खड्डेमुक्त करू, काही रस्ते नवीन केले जातील तर काही रस्त्यांचे पॅचवर्क केले जाईल. पण दिवाळीपूर्वी रस्ते खड्डे मुक्त करू अशी ग्वाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज येथे पत्रकारांना दिली. महापालिकेच्या विविध विभागांच्या कामाचा आढावा घेतल्यानंतर पाटील पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी सतेज पाटील म्हणाले, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून कोल्हापुरात विविध विकास कामांसाठी निधी खेचून आणला आहे. शहरातील रस्त्यांचे विविध कामासाठी 25 कोटीचा निधी मंजूर आहे. त्याची निविदा प्रक्रियाही पूर्ण होत आहे. या कामांना आता लवकरच सुरुवात होईल, त्याचबरोबर कोरोणाच्याच्या काळात आयसोलेशन हॉस्पिटलसाठी जिल्हा नियोजन मंडळातून निधी दिला. या ठिकाणी हे हॉस्पिटल उभा राहिले यापुढे देखील आयसोलेशन हॉस्पिटलच्या इमारतीलगत नवीन इमारत उभा केली जाईल. यासाठी जिल्ह्यातील माध्यमिक आणि इतर काही शिक्षक संघटनांनी पुढाकार घेऊन एक दिवसाचा पगार देण्याची कबुली केली आहे.

सुमारे दोन ते चार कोटी रुपये या माध्यमातून उभे राहतील हा सर्व निधी आयसोलेशन हॉस्पिटल येथे नवीन इमारत बांधण्यासाठी वापरला जाईल. महापालिका प्रशासनाने याची तयारी सुरू करावी असे आदेशही पालकमंत्री सतेज पाटील यांनी यावेळी दिले.

 संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com