बळीराजाचा जोडधंदा आला धोक्यात...

lockdown impact for farmer Milk side business
lockdown impact for farmer Milk side business
Updated on

इचलकरंजी (कोल्हापूर) : लॉकडाउन मुळे पशुखाद्याच्या दरात वाढ झाल्याने व दुधाचा भाव पशुपालकांना परवडत नसल्यामुळे बळीराजाचा दुधाचा जोडधंदा धोक्यात आला आहे. उन्हाळ्यात पशुपालक आधीच जनावरांच्या चाऱ्याची टंचाई, कमी दूध या समस्येच्या अडचणीत सापडलेले असतात. पशुखाद्याच्या वाढत्या दराने यात अधिक भर घातल्याने इचलकरंजीतील 2हजार 400 तर हातकणंगले तालुक्यातील 40 हजार जनावरांच्या जगण्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.


 शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी शासनाकडून दूध व्यवसायाला प्राधान्य देण्यात येते.अशातच उन्हाळ्याचे दिवस आणि जनावरांच्या खाद्यात वाढ झाल्याने पशुपालक अडचणीत सापडले आहेत. खाद्याच्या किमती व दुधाच्या शासकीय दरातील तफावत लक्षात घेता जनावरे कशी पाळावीत असा प्रश्न  पशुपालकांसमोर उभा राहिला आहे. उन्हाळा असल्याने शेतातील सर्व पिकांची काढणी होऊन  शेतजमिनी मोकळ्या पडल्या आहेत.त्यामुळे चाऱ्याची भीषण टंचाई निर्माण होते. तेव्हा या दिवसात दुभती जनावरे दूध कमी देतात. जनावरांना चाऱ्या सोबतच सरकी पेंड, गहू भुसा, मका चुरी, हरभरा चुरी, शेंग पेंड असे विविध खाद्य घालावे लागतात. त्याशिवाय जनावरे अधिक प्रमाणात दूध देत नाहीत.

 सरकी पेंड उत्पादनावर परिणाम
लॉकडाउनच्या काळात पुन्हा पशुखाद्याचे दर वाढल्याने पशुपालकांना महागाईची झळ सोसावी लागत आहे.सध्या सर्व उद्योग, वाहतूक ठप्प आहे. कापूस विक्री बंदचा परिणाम सरकी पेंड उत्पादनावर झाला.सर्व बेकरी उत्पादने तयार करण्यासाठी लागणारा गहू ,मैदा थांबला. त्यामुळे गहू भुसाचा तुटवडा निर्माण झाला.तसेच अन्य पशुखाद्याची वाहतूक बंद असल्याने पुरवठा होत नाही. याचा एकत्रित परिणाम म्हणून पशुखाद्याच्या दरात वाढ झाली. त्यामुळे पशुपालक अनुदानावर देण्यात येणारी जनावरे घेण्याकडे पाठ फिरवत आहेत.पशुखाद्याच्या दरात जशी वाढ केली तसेच दूध उत्पादकांच्या दृष्टीने समतोल विचार करून दुधाच्या दरात वाढ करावी, अशी मागणी बळीराजा करत आहे.

सध्याचे पशुखाद्याचे भाव(प्रतिकिलो)
* सरकी पेंड  -  25 ते 27 रुपये
*  गहू भुसा  -     22 ते 23 रुपये
*   मका चुरी -    20 ते 21 रुपये
*   शेंग पेंड  -     45 ते 50 रुपये

 सर्व प्रकारच्या पशुखाद्याचा तुटवडा निर्माण झाला आहे.लॉकडाउनमुळे सर्व ठिकाणची वाहतूक ठप्प आहे. तसेच पशुखाद्य निर्मिती संबंधित इतर उद्योग बंद आहेत आणि केवळ अनेक पशुखाद्य तयार करणे परवडत नाही. त्यामुळे पशुखाद्याच्या दरात वाढ झाली आहे अर्जून कदम, पशुखाद्य विक्रेते
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com