esakal | राज्यसरकारच्या निर्बंधांना कोल्हापुरात व्यापाऱ्यांचा विरोध

बोलून बातमी शोधा

lockdown impact market kolhapur update kolhapur marathi news

सणाच्या तोंडावर पुन्हा बंद करण्याचे आवाहन केले जात असेल तर व्यवसाय करायचा तरी कधी असा प्रश्‍न व्यापाऱ्यांना पडला.

राज्यसरकारच्या निर्बंधांना कोल्हापुरात व्यापाऱ्यांचा विरोध
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : दोन दिवसांच्या लॉकडाऊननंतर आज सकाळपासून बाजारपेठेतील व्यवहार सुरळीत झाले. पण पोलिस प्रशासनाने दुकाने सक्तीने बंद केल्याने दुपारपर्यंत शहराच्या काही भागात संभ्रमाचे वातावरण तयार झाले. महाद्वार रोड, ताराबाई रोड, शिवाजी रोड, चप्पललाईन परिसरातील दुकाने बंद झाली. 

सकाळी सातच्या सुमारास संचारबंदी संपल्यानंतर दुकाने सुरू झाली. उद्या (ता. 13) पाडवा असल्याने फूल बाजारातही खरेदीसाठी गर्दी झाली. पाडव्यामुळे गिऱ्हाईक होणार या आशेने दुकानदारांची सकाळपासूनच धावपळ सुरू झाली. लक्ष्मीपुरी, राजारामपुरी, शाहूपूरी, न्यू शाहूपूरी, स्टेशन रोड. सुभाष रोड, बिंदू चौक, भाऊसिंगजी रोड, माळकर तिकटी येथील व्यवहार पुर्ववत झाले. सकाळी दहाच्या सुमारास पोलिसांनी पुकारा देत दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. 

पावती फाडली जाईल या भितीपोटी महाद्वार रोड, ताराबाई रोड, तसेच छत्रपती शिवाजी चौक परिसरातील दुकाने बंद झाली. चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी पोलिसांना त्यांचे काम करू द्या.जिल्हा प्रशासनाशी चर्चा करून दुपारपर्यत तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहोत असे सांगितले. ठराविक भाग वगळता अन्य भागातील दुकाने खुलेआम सुरू होती. पोलिस रस्त्यावर विनाकारण थांबू नका असे आवाहन करत होते. 

दोन दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये किराणा माल तसेच अत्यावश्‍यक सेवेतील दुकाने वघळता सर्व दुकाने बंद केली. दोन दिवसांच्या लॉकडाऊनला व्यापारी तसेच दुकानदारांनी चांगला प्रतिसाद दिला. आता सणाच्या तोंडावर पुन्हा बंद करण्याचे आवाहन केले जात असेल तर व्यवसाय करायचा तरी कधी असा प्रश्‍न व्यापाऱ्यांना पडला. त्यामुळे पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद न देता दुकाने सुरूच ठेवली. 

संपादन- अर्चना बनगे