कोल्हापूर जिल्ह्यात उद्या पासून 'हे' सुरु राहणार 'हे' बंद राहणार......

सुनील पाटील
गुरुवार, 21 मे 2020

अंतर्गत बससेवा सुरु होणार...

कोल्हापूर - राज्य शासनाने नॉन रेडझोनमधील जिल्ह्यांसाठी जाहीर केलेले नियम अटीनूसार विविध उद्योग व व्यवसाय सुरु ठेवले जाणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही उद्यापासून (ता. 22) अंतर्गत बससेवा, केशकर्तनालय, बांधकाम प्रकल्प, सलून, स्पा, सकाळी 8 ते सायंकाळी 5 पर्यंत दुकाने बॅंक नियम व अटींसह सुरू केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

कोल्हापूरमध्ये हे सुरु राहणार :

 • - जिल्हांतर्गत बससेवा (50 टक्के क्षमता)
 • -केशकर्तनालय, सलून, स्पा
 • -रिक्षा 1+2 प्रवासी (चालक आणि 2 प्रवासी)
 • - चारचाकी1+2 प्रवासी
 • (चालक आणि 2 प्रवासी)
 • - मद्यविक्री
 • - दुचाकी 1 जण
 • - सरकारी कार्यालये
 • - दुकाने 9 ते 5 पर्यंत
 • - उद्योग, बांधकाम,जीवनावश्‍यक वस्तू, मालवाहतूक
 • - मेडिकल, हॉस्पिटल
 • - खासगी कार्यालये
 • - बॅंक, कुरियर
 • - ई- कॉमर्स दुकाने
 • - घरपोच साहित्ये
 • - आरटीओ, निबंधक ऑफिस
 • - सर्व मैदाने ( फक्त वैयक्तिक व्यायाम करिता, सोशल डिस्टन्स ठेऊन करणे)

 हे बंद राहणार :

 • प्रवास, रेल्वे, विमान, मेट्रो, आंतरराज्य रस्ते वाहतूक, शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, हॉटले, मॉल, मंदिर, प्रार्थनास्थळ.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lockdown loose in kolhapur district