
कोल्हापूर : राज्यातील ग्रामीण भागातील घरकुल बांधकामांना चालना देण्यासाठी साडेचार महिन्यांत राबविलेल्या महाआवास अभियानात राज्यात सात लाख 41 हजार घरकुलांचे बांधकाम केले असून, त्यापैकी तीन लाख 621 घरकुले बांधून पूर्ण झाली आहेत, तर चार लाख 40 हजार 924 घरकुलांचे बांधकाम प्रगतिपथावर आहे, अशी माहिती ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. अभियानाचे यश पाहता अभियानास 1 मे 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचेही मुश्रीफ यांनी जाहीर केले.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, की प्रगतिपथावर असलेल्या घरकुलांपैकी दोन लाख 82 हजार 232 घरकुलांचे बांधकाम जोत्यापर्यंत (प्लिंथपर्यंत), तर एक लाख 58 हजार 692 घरकुलांचे बांधकाम लिंटेलपर्यंत झाले आहे. अभियान कालावधीत 42 हजार 657 भूमिहीन लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. अभियान कालावधीत तीन लाख 85 हजार 518 लाभार्थ्यांच्या घरकुलांना नव्याने मंजुरी दिली. वेळेत घरकुले पूर्ण व्हावी व बांधकामासाठी गवंड्यांची कमतरता भासू नये, यासाठी गवंडी प्रशिक्षणही राबविण्यात येत आहे. आजअखेर सहा हजार 165 गवंडी प्रशिक्षित केले असून, 15 हजार 855 गवंडी प्रशिक्षण प्रगतिपथावर आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत चार कोटी सहा लाख 37 हजार 201 इतके मनुष्यदिवस निर्मिती केली. स्वच्छ भारत मिशनअंतर्गत सहा लाख 37 हजार 974 लाभार्थ्यांना घरकुलाबरोबर शौचालयाचा लाभ दिला. जलजीवन मिशनअंतर्गत चार लाख 68 हजार 351 लाभार्थ्यांना नळाद्वारे पाणीपुरवठ्याचा लाभ दिला. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत तीन लाख 47 हजार 751 लाभार्थ्यांना गॅसजोडणीचा लाभ दिला. सौभाग्य योजनेंतर्गत तीन लाख 19 हजार 648 लाभार्थ्यांना वीजजोडणीचा लाभ दिला. राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत तीन लाख 44 हजार 834 लाभार्थ्यांना उपजीविकेचे साधन मिळवून देण्यासाठी काम केले आहे.
अभियानात सहभागाचे आवाहन
यापुढील काळातही घरकुलचे महाआवास अभियान मिशन मोडवर राबवून ग्रामीण भागातील सर्व बेघरांना आदर्श पद्धतीची घरकुले उपलब्ध करून देण्यात येतील. अभियानात सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थांनी सहभाग घेऊन ते यशस्वी करावे, असे आवाहन मंत्री श्री. मुश्रीफ यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.