'गोकुळ' च्या जोडण्यांपासून महाडिक का अलिप्त...?

mahadik long from gokul elation politics kolhapur marathi news
mahadik long from gokul elation politics kolhapur marathi news

कोल्हापूर - कोल्हापूर जिल्हा दूध संघाच्या (गोकुळ) निवडणुकीतील जोडण्यांपासून माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यासह माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक हे अलिप्त रहाणार आहेत. त्यामुळे सत्तारूढ गटाची या निवडणुकीची सर्व सुत्रे आमदार पी. एन. पाटील सांभाळणार असून नाराज ज्येष्ठ संचालकांसह विरोधकांशीही ते चर्चा करणार आहेत. 

'गोकुळ' संघर्षाला अधिक धार

जिल्ह्याच्या राजकारणात गृहराज्यमंत्री सतेज पाटील व श्री. महाडिक यांच्यातील वादाने टोक गाठले आहे. त्यात 'गोकुळ' मल्टिस्टेट करण्यावरून या दोघांतील संघर्षाला अधिक धार आली. त्याचे पडसाद लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही उमटले. मल्टिस्टेटला सुरूवातीपासून होणारा विरोध आणि त्यावरून एकवटलेले विरोधक याची जाणीव असून निवडणुकीनंतर हा निर्णय मागे घेऊन शहाणपणा केला असला तरी यावरून उठलेले वादळ अजूनही शांत झालेले नाही. ज्येष्ठ संचालक अरूण डोंगळे, माजी अध्यक्ष विश्‍वास पाटील यांची उघड नाराजी हा त्याचाच एक भाग आहे. या घडामोडीपुर्वीच राज्यात सत्तांतर झाले आणि जिल्ह्यातील हसन मुश्रीफ, सतेज पाटील व राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना मंत्रीपदाची संधी मिळाली. 

गेल्या निवडणुकीत ग्रामविकास मंत्री मुश्रीफ सत्तारूढ गटासोबत होते. पण गेल्या तीन चार वर्षातील राजकीय घडामोडी पाहता त्यांचाही श्री. महाडिक यांना तीव्र विरोध आहे. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचाही महाडिक विरोध कायम आहे, किंबहुना या विरोधाला श्री. पाटील यांना मिळालेल्या मंत्रीपदामुळे अधिक धार येणार आहे. सद्यस्थितीत मुश्रीफ-सतेज पाटील एकत्रच रहातील अशी स्थिती आहे. तथापि श्री. मुश्रीफ यांना 'गोकुळ' पेक्षा जिल्हा बॅंकेत अधिक रस आहे आणि बॅंकेची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. अशा परिस्थितीत "गोकुळ' च्या राजकीय घडामोडीतील श्री. महाडिक यांचा वावर हा सत्ताधाऱ्यांच्यादृष्टीने अडचणीचा ठरत आहे. त्यामुळे सत्तारूढ गटाच्या ठराव संकलनावेळी माजी खासदार महाडिक व अमल महाडिक यांना जाणीवपूर्वक अनुपस्थित ठेवण्यात आले. आता पुढील घडामोडीपासून महादेवराव महाडिक यांचाही प्रत्यक्ष अडचणीचा ठरणार असल्याने त्यांनाही या प्रक्रियेपासून अलिप्त ठेवले जाण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे सत्तारूढ गटाचे दुसरे आमदार पी. एन. पाटील यांच्याकडेच सुत्रे राहतील. सत्तारूढ गटाचे इतर संचालक व स्वतः पी. एन. यांच्यासमोर नाराजींची नाराजी दूर करण्याबरोबरच विरोधकांचाही विरोध कमी करण्याचे आव्हान असेल. 

स्वतंत्र ठराव दिलेल्यांशीही चर्चा 

सत्तारूढ गटाच्या तीन संचालकांनीच स्वतंत्र ठराव दिले तर विरोधकांपैकी बहुंताशी नेत्यांनी आपआपल्या गटाचे स्वतंत्र ठराव दिले आहेत. त्यातून सत्तारूढ व विरोधी गटांवरही दबाव टाकण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. अशा विरोधकांना संचालक मंडळातील वाढीव जागा देण्याचा शब्द देऊन आपल्याकडे घेण्याचे प्रयत्न सत्तारूढ गटाकडून सुरू आहे, त्यात पी. एन. यांनीच पुढाकार घेतला आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com