कंपनीवर गुन्हा दाखल करून विक्रेत्याला साक्षीदार करा; यांनी केली मागणी

Maharashtra Fertilizers Pesticide Seeds‌ Dealer Association's Demand Form To Agriculture Officers Kolhapur Marathi News
Maharashtra Fertilizers Pesticide Seeds‌ Dealer Association's Demand Form To Agriculture Officers Kolhapur Marathi News

गडहिंग्लज : कंपनीकडून येणारे सीलबंद बियाणे कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडून विक्री केले जाते. असे असूनही बोगस निविष्ठासंदर्भात विक्रेत्यालाच जबाबदार धरले जाते. हे अन्यायी असून कोणत्याही निविष्ठेचा नमुना बोगस निघाल्यास विक्रेत्याला दोष न धरता कंपनीवर गुन्हा दाखल करून विक्रेत्याला साक्षीदार करावे, अशी मागणी कृषी सेवा केंद्र चालकांनी केली आहे. 

विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र फर्टिलायझर्स पेस्टीसाईड सीडस्‌ डीलर असोसिएशनने (माफदा) आजपासून (ता. 10) 12 जुलैपर्यंत राज्यव्यापी बंद पुकारला आहे. गडहिंग्लज तालुक्‍यातील 82 कृषी सेवा केंद्रे सहभागी झाली आहेत. याबाबत गडहिंग्लज तालुका कृषी निविष्ठा व्यापारी संघटनेने तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला निवेदन देऊन आंदोलनाची माहिती दिली. 

या खरीप हंगामात कंपनीकडून आलेल्या सीलबंद सोयाबीन पिशव्यांची विक्री केली. यामध्ये विक्रेत्यांचा कोणताही दोष नसताना सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या कारणाने विक्रेत्यास जबाबदार धरून गुन्हे दाखल करण्याचे प्रकार घडले. हा प्रकार विक्रेत्यांवर अन्याय करणारा आहे, असे संघटनेचे म्हणणे आहे. याशिवाय संघटनेच्या विविध मागण्यांबाबत माफदाने वेळोवेळी कृषी आयुक्तांशी चर्चा करून प्रश्‍न मांडले आहेत. तरीसुद्धा अद्याप त्याच्यावर कार्यवाही झालेली नाही.

विक्रेत्यांवर गुन्हे दाखलची प्रक्रिया थांबवावी, युरिया खतासोबत कंपनीकडे होणारे लिंकींग थांबवावे, कृषी निविष्ठाचे नमुने काढतेवेळी संबंधित विक्रेत्याला त्या मालाचे बिल तातडीने मिळावे, तसेच संबंधित विभागाकडून अतिरिक्त आर्थिक कोटा मंजूर करून घेण्यात यावा, आदी मागण्या संघटनेच्या आहेत. तालुका कृषी निविष्ठा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष रवींद्र घेज्जी, उपाध्यक्ष संदीप पाटील, सचिव प्रकाश पाटील, अवधूत केसरकर, सचिन पाटील आदींच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले. 

संपादन ः सचिन चराटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com