Video : एक एक मास्क देतो माणूसकीचा भाव.... 

Make masks themselves by summaya in kolhapur marathi news
Make masks themselves by summaya in kolhapur marathi news
Updated on

कोल्हापूर ; कोरोनाचं गांभीर्य सर्वत्र वाढलं आणि लॉकडाऊन सुरू झाले. संसर्ग टाळण्यासाठी मास्कला मागणी वाढली. मागणी तितका पुरवठा करण्यात मास्कचा बाजार तेजीत आला. काहींनी त्यात आर्थिक कमाईचा प्रयत्न केला. याबरोबर उलट कळंबा परिसरातील सुमैय्या सय्यद यांनी आर्थिक मर्यादा असतानाही रोज स्वतः मास्क बनवितात. परिसरातील नागरिकांना त्याचे वाटप करत त्यांनी माणुसकीचा भाव जपला आहे. 

सुमैय्या या टेलरिंग काम करतात. शिवणकाम करताना अनेकवेळा त्यांच्याकडे कापडाचे तुकडे उरतात. याच उरलेल्या तुकड्यांचा वापर त्यांनी मास्क तयार करण्यासाठी केला. कोरोनाचा संसर्ग जसा वाढेल तसे मास्कचा वापर आवश्‍यक बनला. मास्क घातल्याशिवाय कोणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहन शासनाने केले. जीवनावश्‍यक वस्तू आणण्यासाठी घराबाहेर पडणे गरजेचे होते. सहजासहजी मास्क मिळत नाहीत हे लक्षात आल्यानंतर सुमैय्या यांनी घरीच मास्क तयार करून वाटायचे, असे ठरवले.

सोशल मिडीयीचा असाही वापर

युट्युबवरील व्हिडीओ पाहून मास्क कसा बनवायचा, हे लक्षात घेतले. आठ दिवसांपुर्वी घरातच त्याचा प्रयोग करून पाहिला. साध्या, स्वच्छ कापडापासून घरातल्या घरात मास्कचा वापर केला तरी कोरोनापासून बचाव करता येऊ शकतो, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांच्या सासू नसीमा यांच्या मदतीने शिलाईमशीनवर मास्क बनविण्यास सुरूवात केली. आतापर्यंत सुमारे 250 मास्क बनवून ते परिसरातील नागरिकांना वाटले आहेत. कोरोनासारख्या जागतिक संकटात जमेल तेवढ्या पद्धतीने समाजात मदत करता येते, याचाच आदर्श सुमैय्या यांनी घालून दिला आहे. 

बाजारात मास्कची कमतरता आहे. कोरोनाचा संसर्ग टाळायचा असेल तर मास्क वापरणे गरजेचे आहे. शिवणकामामुळे माझ्याकडे कापडाचे उरलेले तुकडे होते. यातून मास्क तयार करू लागले व परिसरात वाटू लागले. 
- सुमैय्या सय्यद  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com