कोकण - कर्नाटकी आंब्यांची दरात अशी चाललीय टक्कर...

Mango arrivals have increased in the Nipani market
Mango arrivals have increased in the Nipani market

निपाणी - या आठवड्यात निपाणी बाजारपेठेत चोहोबाजूनी आंब्याची आवक वाढली आहे. दराबाबत रत्नागिरी, देवगड आणि कर्नाटकी हापूसमध्ये चांगलीच टक्कर आहे. मात्र दर उतरल्याने आंबा सर्वसामान्यांच्या आवाक्यात आहे. फळबाजारात खरेदीसाठी गर्दी जाणवत आहे.

टाळेबंदीने वाहतुकीच्या समस्येत सापडल्याने मार्च ते मेच्या मध्यापर्यंत ४०० ते ७०० रुपये डझन असा भाव आंबा खाऊन गेला. मात्र आता चौथ्या टप्प्यात वाहतुकीत शिथिलता आल्याने देवगड, रत्नागिरी, मालवण, सावंतवाडी, वेंगुर्ले परिसरातील आंब्याची मुबलक आवक वाढली आहे. एक डझनाच्या बॉक्सपासून चार-सहा डझनाच्या पेटीतून आंबा उपलब्ध आहे. हा आंबा २५० ते ४०० रुपये डझन असा प्रतवारीनुसार विकला जात आहे. कोकण आणि कर्नाटकी आंब्यांच्या दरात मोठी तफावत नाही.

चव आणि रसाळपणात कोकणच्या आंब्यास तोडीसतोड असलेल्या कर्नाटकी हापूसची आवकही जोरदार आहे. हल्याळ, हुबळी, धारवाड, बेळगाव परिसरातून येणारा हा आंबा २०० ते ३०० रुपये डझनाने विकला जात आहे. याशिवाय मानकूर, पायरी व स्थानिक झाडी आंब्याबरोबरच लोणची आंबाही उपलब्ध झाला आहे. अशोकनगर, गुजरी, दलालपेठ, नेहरूचौक, नगरपालिका परिसर, साखरवाडी भागात बॉक्स आणि बुट्ट्या घेऊन विक्रेते बसले आहेत. काही ठिकाणी टेंपो व ट्रकमधूनही विक्री सुरू आहे. सर्वसाधारण आंब्याचा ५० ते १५० रुपये असा भाव आहे. पाऊस झाल्यानंतर आंब्याच्या खाण्यावर परिणाम होतो. म्हणून या आठवड्यात वाढलेल्या आवकेचा फायदा घेत आंबा खरेदीला जोर आला आहे.

'पंधरा दिवसापासून स्थानिकसह कोकण आणि कर्नाटकाच्या आंब्यांची आवक मुबलक सुरू आहे. दरही सर्वसामान्यांच्या आवाक्यात असल्याने खरेदीसाठी प्रतिसाद आहे.'
- सलीम बागवान,
फळ विक्रेते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com