कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरातील मार्केटमधील गर्दी घटली...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 मार्च 2020

कोणाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शहरवासीय घरातून  बाहेर पडायला तयार नसल्याचे चित्र आहे. खाजगी नोकरदार व सरकारी अधिकारी, कर्मचारी वर्ग कामानिमित्ताने कार्यालयात जात आहेत. शहरातील रस्त्यांवरील वर्दळही कमी झाली आहे.

कोल्हापूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील मार्केटमधील गर्दी घटली असून पालेभाज्या,‌ फळ खरेदीसाठी महिला व ज्येष्ठ नागरिक काही प्रमाणात येत असल्याचे दिसत आहे. ग्रामीण भागातील महिला गाजर, काकडी, मेथी, पोकळा, काकडी, कांद्याची पात, वरणा, भेंडी, वांगी, गवार घेऊन रस्त्याच्या कडेला विक्रीसाठी ठाण मांडून आहेत.

कोणाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शहरवासीय घरातून  बाहेर पडायला तयार नसल्याचे चित्र आहे. खाजगी नोकरदार व सरकारी अधिकारी, कर्मचारी वर्ग कामानिमित्ताने कार्यालयात जात आहेत. शहरातील रस्त्यांवरील वर्दळही कमी झाली आहे. जीवनावश्यक वस्तूंसाठी नागरिकांना दुकानाकडे धाव घ्यावी लागत आहे. शहरातील कपिलतीर्थ, अण्णासाहेब पाडळकर मार्केट, रेसकोर्स नाका, ऋणमुक्तेश्वर, लक्ष्मीपुरी, रंकाळा स्टँड परिसर, नवा वाशी नाका, पाच बंगला परिसर, शाहूपुरीतील भाजीपाला मार्केटमध्ये नागरिक महिला व नागरिकांची भाजीपाला व फळ खरेदीसाठी गर्दी घटली आहे. ग्रामीण भागातील महिला मात्र टोपलीतून शहरातील मुख्य रस्त्यांकडेला भाजीपाला विक्रीसाठी ठाण मांडून आहेत. 

वाचा - बस मध्ये का चढलात ? कोणाची परवानगी घेतलीत ? म्हणत प्रवाशाने घातली हूज्जत... 

"भाजीपाला घेऊन सकाळी शहरात विक्रीसाठी आल्यानंतर अकरापर्यंत सर्व भाजीपाल्याची विक्री व्हायची. दुपारी बारा वाजता आम्ही आमच्या गावात परत जात होतो. या आठवड्यात भाजीपाल्याची खरेदी कमी प्रमाणात झाली आहे," असे भाजीपाला विक्रेत्या विमल पाटील यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Market corridors in Kolhapur city dwindle due to Corona