नागरिकांच्या जीवाशी खेळ ; भोगावती नदीत सुया आणि सीरिंज

medical material like siring drawn in bhogavati river in kolhapur is dangerous to citizen health
medical material like siring drawn in bhogavati river in kolhapur is dangerous to citizen health

बालिंगा (कोल्हापूर) : येथील भोगावती नदीच्या पात्रात जैववैद्यकीय कचरा टाकण्यात आला आहे. यात वापरलेल्या सीरिंजचा समावेश आहे. येथूनच दहा गावांसह कोल्हापूर शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे.

नागरिकांच्या जीवाशी खेळण्याच्या या प्रकारामुळे नागरिकांतून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. सकाळी ही घटना उघड झाली. सुदैवाने पुलाच्या पिलर दुरुस्तीसाठी टाकलेल्या मुरुमावर सुयांचा ढीग टाकला आहे. बालिंगा, नागदेववाडी, हणमंतवाडी, शिंगणापूर, खुपिरे, साबळेवाडी, शिंदेवाडी, वरणगे, चिखली, आंबेवाडी व शहराला पिण्याचा पाणीपुरवठा केला जातो.

कचऱ्यामुळे दूषित पाणी थेट पिण्यासाठी जाते. यामुळे नागरिकांच्या जिवाशी खेळण्याचा हा प्रकार सुरू आहे. पहाटे सकाळी आठपर्यंत परिसरात दाट धुके होते. धुक्‍याचा फायदा घेत अनोळखीने पोतंभर वापरलेल्या सुया थेट पात्रात टाकल्या. ग्रामपंचायतीच्या वतीने सुया गोळा केल्या. या सुया प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ताब्यात देणार असल्याची माहिती दिली. दरम्यान, याबाबत माहिती विचारण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता फोन उचलण्यात आला नाही.

"खासगी डॉक्‍टर किंवा अन्य कोणी हा जैव कचरा टाकला त्याची ग्रामपंचायत व आरोग्य विभागामार्फत बॅच नंबर तपासून चौकशी करून कारवाई करू."

- डॉ. विनोद मोरे, प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी करवीर

"नदीच्या काठावर कचरा टाकला जातो. यावर कोणाचाच वचक नाही. आता तर थेट नदीपात्रात जैविक कचरा टाकला आहे. हा  नागरिकांच्या जीवाशी खेळ आहे. याबाबत दोन वेळा आंदोलने केली, आता तीव्र आंदोलन छेडू."

- अमित पाटील, मनसे जिल्हा उपाध्यक्ष

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com