
कोल्हापूर - माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उद्या कोल्हापूरमध्ये येत आहेत. यानिमित्त त्यांचे सहकारी आणि नेते मंडळी बिळातून बाहेर येवून सरकार म्हणून कोल्हापूरमध्ये गेले पाच-सहा महिने आम्ही काय संघर्ष करतोय ते बघतील, अशी टीका ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपच्या नेत्यांवर आणि कार्यकर्त्यांवर केली. जिल्हाधिकारी कार्यालयात श्री मुश्रीफ यांनी कोरोनाच्यापार्श्वभूमीवर आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी मुश्रीफ म्हणाले, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून स्वागत करतो. त्यांनी राज्यभर दौरा केला आहे. पश्चिम महाराष्ट्रात येत आहेत. त्यांचाही काही अनुभव असेल तर त्यांच्या सूचनांचे स्वागत केले जाईल. मात्र, श्री फडणवीस कोल्हापूरमध्ये येत असल्यामुळे त्यांचे नेते आणि कार्यकर्ते जे बिळात बसले आहेत. ते बाहेर येवून सरकार म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात जे काही काम झाले ते पाहतील. संजय घोडवत आणि नितीन पटेल यांनी कोरोना रुग्णांसाठी खूप मोठी मदत केली आहे. त्यांनी रुग्णांना दिलेल्या आपल्या वास्तू वाखान्याजोग्या आहेत. यानिमित्ताने श्री फडणवीस यांनी या दोन्ही ठिकाणी जावून पाहणी करता आली तर करावी. यावरूनच सरकार म्हणून आम्ही केलेले काम, आयजीएम येथे केलेले काम पहावीत, असे आवाहनही श्री मुश्रीफ यांनी केली. त्यांनी पहाणी केल्यानंतर ज्या काही सूचना देतील त्या सूचनांचे पालन केले जाईल, अशी ग्वाही श्री मुश्रीफ यांनी दिली.
कोरोनाचे रुग्ण देशातच वाढत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरुप्पा यांनाही कोरोना झाला. त्यामुळे कोल्हापूरात रुग्ण वाढले म्हणून टीका करायचे कारण नाही. सगळीकडेच रुग्ण वाढत आहेत. मात्र, ही संख्या हळू हळू कमी येईल, असा विश्वासही श्री मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
संपादन - धनाजी सुर्वे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.