ब्रेकिंग : आत्याचार करून चिमुरडीचा खून ; दोघांकडून घाणेरडे कृत्य

सकाळ वृत्तसेवा
Monday, 15 June 2020

या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी दोन्ही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

इचलकरंजी : चारवर्षीय चिमुरडीवर शेजारीच राहणार्‍या दोन अल्पवयीन मुलांनी लैंगिक अत्याचार करुन तिचा विहिरीत ढकलून देवून खून केला. इचलकरंजीपासून नजिकच असलेल्या चंदूर (ता.हातकणंगले) येथील शाहूनगर परिसरात ही गंभीर घटना घडली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी दोन्ही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत मुलीच्या आईने याबाबत पोलिसांत तक्रार दिली आहे.  

याबाबत अधिक माहिती अशी, संशयीत व मृत मुलीचे कुटुंब एकाच गल्लीत राहतात. काल रविवारी दुपारी मुलीला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून दोन्ही अल्पवयी संशयितांनी नजिकच असलेल्या शेतात घेवून गेले. तेथे तिच्यावर दोघांनी अतिप्रसंग केला. त्यानंतर तिला विहिरीत ढकळून देवून खून केला.
 दरम्यान, नातेवाईकांनी मुलीचा सर्वत्र शोध सुरु केला. नजिकच असलेल्या गोरखनाख कुंभार यांच्या पडक्या विहीरीत तिचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे नातेवाईकांना धक्काच बसला. नंतर तिचा मृतदेह दफन केला. मात्र या घटनेबद्दल नातेवाईकांना शंका आली. घरापासून ते विहिरीच्या मार्गावरील एका यंत्रमाग कारखान्याच्या सीसीटीव्हीची पाहणी करण्यात आली.
 यामध्ये एक अल्पवयीन मुलगा संबंधित मुलीला घेवून जात असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. त्यानंतर नातेवाईक व नागरिकांनी त्याच्याकडे चौकशी केली. सुरुवातीला त्यांने संभ्रम निर्माण करणारी माहिती दिली. आज सकाळी त्याला शिवाीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्यांनी लैंगिक अत्याचार करुन खून केल्याची कबुली दिली. त्यानुसार त्याच्या दुसर्‍या साथिदारालाही पोलिसांनी ताब्यात घेतले.

हे पण वाचा - ब्रेकिंग ; कोल्हापुरात पत्नीकडून डोक्याता होतोडा घालून पतीचा खून

 हे पण वाचा -  भाडेकरूंनी घर भाडे न दिल्याच्या रागातून मालकाने घरात जावून केला धक्कादायक प्रकार 

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: minor girl killed after rape in kolhapur ichalkaranji