ब्रेकिंग ; कोल्हापुरात पत्नीकडून डोक्यात हातोडा घालून पतीचा खून 

wife killed husband in kolhapur panhala
wife killed husband in kolhapur panhala

कोडोली (जि. कोल्हापूर) - पत्नीने डोक्यात हातोडा घालून पतीचा खून केल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे. संजय तुकाराम घेवदे (वय 52) असे मृत पतीचे नाव आहे. मुलगा रोहित घेवदे याने आई विरूद्ध कोडोली पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे.

पन्हाळा तालुक्यातील जाखले गावातील सत्यवती कॉलनीमध्ये ही घटना घडली आहे. घरगुती वादातून खून केल्याची कबुली पत्नीने कोडोली पोलिस ठाण्यात दिली आहे. 

याबाबत कोडोली पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, सत्यवती कॉलनीत रहाणारे संजय घेवदे हे वारणा साखर कारखान्याचे कर्मचारी व वारणा कामगार सोसायटीचे संचालक आहेत. संजय व पत्नी संगीता यांच्यात घरगुती कारणातून वाद झाला. वादाचे रूपांतर धक्का बुक्कीत झाले. यामध्ये संजय हे खाली पडले. त्यावेळी पत्नी संगीता हिने घरातील लोखंडी हातोडा त्यांच्या डोक्यात घातला. या पती संजय यांचा जागीच मृत्यू झाला.

त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. या घटनेची फिर्याद नोंदवल्यावर घटनास्थळी कोडोली पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक सूरज बनसोडे, फौजदार नरेद्र पाटील यांनी भेट देवून घेवदे यांना कोडोली येथील उप जिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झालेचे डॉक्टरांनी सांगितले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com