
कोल्हापूर - २३ नोव्हेंबर २०२० ला सकाळी राजभवनात मोजक्या लोकांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. परंतु, दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी 'मिरची हवन' हा विधी केला होता, अशी माहिती समोर आली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मिरची हवन केले होते, असा दावा चेकमेट: हाऊ द बीजेपी वोन अँड लॉस्ट महाराष्ट्र (Checkmate: How the BJP Won and Lost Maharashtra) या पुस्तकात करण्यात आला आहे.
कोल्हापुरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
सुधीर सूर्यवंशी यांनी हे पुस्तक लिहिले आहे. नुकतेच यावर इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनीही आपल्या फेसबुकवर पोस्ट लिलिली आहे.
इंद्रजित सावंत आपल्या पोस्ट मध्ये लिहितात, ''नुकतेच सुधीर सूर्यवंशी यांनी लिहलेले checkmet : How the BJP Won and lost Maharastra हे पुस्तक प्रकाशित झाले. यात पहाटेच्या सरकार स्थापनेचा खेळ कसा रंगला? यावेळी राजकीय सारीपाटावरच्या सोंगट्या कशा चालल्या याची कहाणी दिली आहे. यातच देवेंद्र फडणविसांनी या सरकार स्थापने दिवशी पहाटे उत्तरेतून तांत्रिक पुजारी आणून बगळामुखी देवीला प्रसन्न करून शञूंचा पराजय आणि आपला जय व्हावा यासाठी मिर्ची यज्ञविधी केल्याचा ही उल्लेख आला आहे. तसेच या तांत्रिक लोकांनी सांगितले म्हणून #काळ्या रंगाचे मोदी जाॕकेट घातले वगेरे वगैरे उल्लेख ही या ग्रंथात आहेत. आता असा यज्ञ फडणविसांनी का केला. हरीष रावत या मुख्यमंत्र्यांची उत्तरांखंडची सत्ता अशा बगळामुखी देवीच्या यज्ञाने वाचली; असेही कारण या पुस्तकात दिले आहे. खरे तर उत्तर भारतात बगळामुखी देवतेची अशी आराधना करण्याचे फ्याॕड खूप शतके सुरू आहे.
शिव काळात औरंगजेबाने रजपूत सरदार मिर्झाराजा जयसिंगयाला शिवाजी महाराजांच्या विरुद्ध पाठवले. त्यावेळीही या जयसिंगाने असाच धावा बगळामुखीचा केला होता. या संदर्भात शिवरायांची कारकीर्द ज्यांने पाहिली होती त्या आद्य शिवचरित्रकार कृष्णाजी अनंत सभासदाने आपल्या बखरीत या जयसिंगाच्या बगळामुखी व इतर यज्ञा बद्दल लिहले आहे.
सभासद लिहतो , " जेव्हां ते दिल्लीहून निघाले तेव्हां पूर्वी शाहिस्ताखान चालला त्याप्रमाणे दळभार निघाला. भूमी आकाशापर्यंत एकच धुरळा उडाला. ऐसा सेनासमुद्र दक्षिणेस चालला. मजला दर मजला चालिले. मुक्काम होय तेथे दीड गांव लांब व एक गांव रुंद लष्कर राहात असे. तेव्हां जयसिंग राजा यानीं मनांत विचार केला की , शिवाजी मोठा दगेबाज , मोठा हुन्नरवंत आणि मर्दाना शिपाई , आंगाचा खासा आहे. अफजलखान अंगें मारिला. शास्ताखानाच्या डेऱ्यात शिरून मारामारी केली. आपणास यश कसे होईल ? म्हणून चिंता केली. तेव्हां मोठे मोठे ब्राह्मण पुरोहित यांनी उपाय सांगितला. देवी प्रयोगी अनुष्ठाने करावी आणि अकरा कोट लिंगे करावी. म्हणजे यश येईल , असें सांगितले. मग मिर्जा राजा बोलिला की, कोटीचंडी कामनाथ बगळामुखी कालरात्रीप्रीत्यर्थ जप करावा. असें अनुष्ठान करावें.
चारशें ब्राह्मण अनुष्ठानास घातले. प्रत्यहीं अनुष्ठान चालले. अनुष्ठानास दोन कोटी रुपये अलाहिदा काढून ठेविलें. आणि तीन मास अनुष्ठान चालून सिद्ध केलें. अनुष्ठानाची पूर्णाहुती होऊन , ब्राह्मणांस दान दक्षिणा देऊन संतर्पण केले. मग मजला चालिले. " मिर्झाने एवढे उपाय करुनही त्याला यश आले नाही. उलट मिर्झाचाच वर्ष दिडवर्षातच विषबाधेने मृत्यू झाला. असो आज हे पुस्तकातील बगळामुखी- मिर्ची यज्ञाचे उल्लेख वाचल्या नंतर हा इतिहासातील उल्लेख आठवला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.