
कोल्हापूर : गेल्या तेवीस दिवसांत कोल्हापूर परिमंडळातून वीजपुरवठा खंडित झाल्याच्या 3701 तक्रारी महावितरणकडे झाल्या आहेत. मोबाईलद्वारे मिस्ड कॉल व एसएमएसची सोय वीज ग्राहकांना उपलब्ध झाल्याने, त्याचा लाभ उठवला आहे. दरम्यान, राज्यातील राज्यातील 53160 वीजग्राहकांनी "मिस्ड कॉल' तर 1583 वीजग्राहकांनी "एसएमएस' सुविधेचा वापर करत वीजपुरवठा खंडित झाल्याच्या तक्रारी केल्या आहेत.
गेल्या महिन्याभरापासून राज्याच्या अनेक भागात वादळी व मुसळधार पावसाचे थैमान सुरु आहे. वादळामुळे झाडे किंवा झाडांच्या फांद्या वीजयंत्रणेवर कोसळल्याने अनेक भागातील वीजपुरवठ्यावर परिणाम होत आहे. या स्थितीते गेल्या 23 दिवसांत राज्यभरात वीजपुरवठा खंडित झाल्याच्या एकूण 1 लाख 39 हजार 751 तक्रारी महावितरणचे मोबाईल ऍप, वेबसाईट, टोल फ्री क्रमांकाद्वारे प्राप्त झाल्या.
कोल्हापुरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
- मिस्ड कॉलद्वारे तक्रार करण्यासाठी मोबाईल क्रमांकाची नोंदणी आवश्यक
- नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून महावितरणच्या 022-41078500 या क्रमांकावर मिस्ड कॉलची सोय
- "एसएमएस'द्वारे तक्रार करण्यासाठी मोबाईल क्रमांकाची नोंदणी आवश्यक नाही
- मोबाईल क्रमांकावरून NOPOWER हा "एसएमएस' महावितरणच्या 9930399303 मोबाईल क्रमांकावर पाठवावा.
- www.mahadiscom.in वेबसाईट, मोबाईल ऍप तसेच 24X7 सुरु असलेल्या कॉल सेंटरच्या 18001023435, 18002333435 किंवा 1912 या टोल फ्री क्रमांकावर तक्रारींचा स्वीकार
हे पण वाचा - कोल्हापुरात परप्रांतिय कामगारांचा उद्रेक, शेकडो कामगार रस्त्यावर
मोबाईलद्वारे "मिस्ड कॉल' सुविधेचा वापर करून तक्रार नोंदविणारे वीजग्राहक असे : कल्याण परिमंडळ - 10921, पुणे - 8704, भांडूप- 5426, नागपूर- 4852, नाशिक- 3939, कोल्हापूर- 3701, बारामती- 2424, जळगाव- 1609, औरंगाबाद- 2014, अकोला- 2555, अमरावती- 1805, चंद्रपूर- 822, कोकण- 785, नांदेड- 1466, गोंदिया- 725, लातूर 141.
हे पण वाचा - अन् वाढदिनीच वाहावी लागली श्रद्धांजली...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.