कामगारप्रश्‍नी आमदार पाटील भेटणार मंत्री मुश्रीफ यांना

MLA Patil Will Meet Minister Mushrif On Labor Issue Kolhapur Marathi News
MLA Patil Will Meet Minister Mushrif On Labor Issue Kolhapur Marathi News

गडहिंग्लज : सुदैवाने जिल्ह्याला व केडीसी बॅंकेला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासारखे नेतृत्व मिळाल्याने आज गोडसाखर व दौलत कारखाना सुरू होवू शकला. यामुळे शेतकऱ्यांच्या उसाची चिंता मिटली आहे. गोडसाखर निवृत्त कामगारांच्या थकीत देणीविषयी मंत्री मुश्रीफ यांच्याशी भेटून चर्चा करून हा प्रश्‍न सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याची ग्वाही आमदार राजेश पाटील यांनी येथे दिली. 

गेल्या 20 दिवसापासून प्रांत कार्यालयासमोर सुरू असलेल्या गोडसाखर निवृत्त कामगारांच्या धरणे आंदोलनाला आमदार श्री. पाटील यांनी भेट देवून पाठींबा दर्शविला. मंत्री मुश्रीफ हे कोणत्याही परिस्थितीत कामगारांना वाऱ्यावर सोडणार नाहीत, असा आत्मविश्‍वास व्यक्त करून आमदार पाटील म्हणाले, ""वैयक्तिक महत्वाकांक्षेसाठी संस्थेचा वापर करून राजकीय अड्डे बनवल्याने अनेक संस्था अडचणीत आल्या आहेत.

या परिस्थितीला माझ्यासह सर्वच घटक जबाबदार आहेत. दौलतच्या प्रसंगात माझ्या नशीबीही अशी वेळ आली आहे. गोडसाखरचा वैभव आणि आताच्या स्थितीबाबत खंत वाटावे, असे वातावरण आहे. निवृत्त कामगारांच्या भावना चुकीच्या नाहीत. सुदैवाने मुश्रीफांचे नेतृत्व मिळाले म्हणूनच गडहिंग्लज व दौलत कारखाना सुरू होवू शकला. अन्यथा यापेक्षा वाईट स्थिती आज पहायला मिळाली असती.

कामगारांचे संघटन महत्वाचे आहे. मध्यंतरी कामगारांत फूट पाडण्याचे कारस्थान झाले. आता कामगारांनी डगमगू नये. अखेरपर्यंत संघटीत रहावे. निवृत्त कामगारांच्या प्रश्‍नासाठी मी स्वत: मंत्री मुश्रीफ यांच्याशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करेन.'' 
माजी संचालक शिवाजी खोत यांनी आंदोलनाचा आढावा घेतला.

कारखाना व्यवस्थापन व कंपनीने तत्काळ देणी देण्याची तारीख जाहीर करावी, अशी मागणीही त्यांनी केली. तालुका संघाचे माजी उपाध्यक्ष दशरथ कुपेकर, राजेश पाटील-औरनाळकर यांची भाषणे झाली. माजी संचालक महाबळेश्‍वर चौगुले, चंद्रकांत बंदी, सुभाष पाटील, रणजित देसाई यांच्यासह कामगार उपस्थित होते. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com