इचलकरंजीत राडा ; मनसेच्या कार्यकर्त्यांनी महावितरणचे कार्यालय फोडले

ऋषिकेश राऊत
Friday, 19 February 2021

शहरातील महावितरणचे कार्यालय मनसेच्या कार्यकर्त्यांनी फोडल्यामुळे मोठा गोंधळ उडाला.

इचलकरंजी :  काही दिवसांपासून महावितरणाकडून थकीत वीज ग्राहकांचे वीज कनेक्शन कापण्याची मोहीम सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर महावितरणाने शहरातील अनेक घरगुती व व्यावसायिक व ग्राहकांची वीज कनेक्शन कापली आहेत. मनसेने लॉकडाऊन काळातील वीज बिले पूर्णपणे माफ करावेत, अशी मागणी महावितरणकडे केली होती. तरीदेखील वीज कनेक्शन  कापल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी दुपारी मनसेने अचानक  महावितरण कार्यालयाची तोडफोड केली. 

सर्व कामकाज चालू असताना अचानकपणे मनसेच्या कार्यकर्त्यांनी कार्यालय पाडल्याने मोठा गोंधळ उडाला. सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढून संपूर्णपणे महावितरणमधील साहित्याचे नुकसान केले आहे. व्यावसायिक व  घरगुती वीज बिल,महावितरणा कडून कापल्याच्या निषेधार्थ मनसे कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केली. त्या ठिकाणी त्वरित पोलिस उपाधीक्षक बाबुराव महामुनी यासह शहरातील सर्व पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

हेही वाचा- 1970 च्या दशकातील उद्योगांची ही आहे अवस्था

शहरातील महावितरणचे कार्यालय मनसेच्या कार्यकर्त्यांनी फोडल्यामुळे मोठा गोंधळ उडाला. सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढून कार्यालयाचे पूर्णपणे तोडफोड केली. मोठा पोलिस बंदोबस्त महावितरण कार्यालयातवर तैनात करण्यात आला आहे.

संपादन -अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS workers broke into the MSEDCL office in ichalkaranji electricity marathi news