esakal | ब्रेकिंग : कोल्हापूरात आज आणखी 33 पॉझिटिव्ह रूग्णांचा समावेश....
sakal

बोलून बातमी शोधा

moe 17 corona  patient found in kolhapur district

काल एका दिवसात 62 रूग्ण पॉझिटिव्ह आले होते .

ब्रेकिंग : कोल्हापूरात आज आणखी 33 पॉझिटिव्ह रूग्णांचा समावेश....

sakal_logo
By
अर्चना बनगे

कोल्हापूर :  गेल्या तीन महिन्यापासून कोरोना रूग्ण संख्या वाढ  होताना आज आणखीन 33 रुग्ण  पॉझिटिव्ह आढळले आहेत.  काल एका दिवसात 62 रूग्ण पॉझिटिव्ह आले होते .त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा कहर झाला असून एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 1278 वर पोहचला आहे. 

हेही वाचा- कोल्हापूरात लॉकडाऊन नाही : पालकमंत्री सतेज पाटील -

शिरोळ तालुक्यात रूग्णांचा कहर सुरुच आहे .एकाच कुटुंबातील 6 जण पॉझिटिव्ह आल्याने शिरोळ तालुक्यात खळबळ माजली आहे.आज  पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीमध्ये कोल्हापूर शहर 3 , करवीर 12  पन्हाळा 7,  शिरोळ 9 , शाहुवाडी 1 या तालुक्यातील रूग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात एकूण 852 रुग्ण आतापर्यंत बरे झाले असून 25 रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर 408 रुग्ण सध्या उपचार घेत आहेत.

हेही वाचा-अरेच्या... कोल्हापुरात चार दिवसात वाढली मास्क वापरणाऱ्यांची संख्या -