गुटखा तस्कर "एमडी गॅंग'वर मोका  ; राज्यात पहिलीच कारवाई 

moka action on Gutkha smuggler MD Gang
moka action on Gutkha smuggler MD Gang

कोल्हापूर - गुटखा तस्कर करण्यात सक्रीय असणाऱ्या जयसिंगपुरातील "एमडी गॅंग'चा मुख्य सूत्रधार महेश दळवीसह 11 जणांवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली. या प्रस्तावास विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी मंजूरी दिली. राज्यात अशा पद्धतीची ही पहिलीच कारवाई ठरली. 

मोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या संशयितांची नावे ः महेश बजरंग दळवी (रा. दानोळी, शिरोळ), जुबेर अहमद शेख (रा. बंगरूळ, कर्नाटक), इम्रान अल्ताफ पाशा ( रा. बंगरूळ, कर्नाटक, ), अशरफ अली उस्मान अली ( रा. नागपूर), मोहंमद साजिद अब्दुल जब्बार पटनी (रा. औरंगाबाद), अभिनंदन उर्फ अभ्या राजकुमार पाटील धडेल ( रा. कोथळी), समीर जहॉंगीर पट्टेकरी (रा. इचलकरंजी), भरतेश सिद्राम कुडचे (रा. मिरज, जि.सांगली), महंमद जुनैद अब्दुल गफार दिवाण (रा.नागपूर), रणजित प्रकाश मिसाळ (रा. मिरज, जि. सांगली), अमर भिमसिंग रजपुत (रा. जयसिंगपूर, ता. शिरोळ) अशी आहेत. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, जानेवारी महिन्यात चॉंदपाशा सनाऊल्ला (रा. बंगरूळ, कर्नाटक) यांनी दिलेल्या फिर्यादेनुसार जयसिंगपूर पोलिस ठाण्यात एमडी गॅंगवर गुन्हा दाखल झाला होता. चॉंदपाशा त्यांचा मित्र नरसिंह मूर्ती हे दोघे बंगरूळ येथे राहतात. त्या दोघांनी 150 गुटखाच्या बॅगा कंटेरनमधून अथणी (बेळगाव) येथे घेऊन जात होते. कंटेनरमधील 150 पैकी 53 बॅगांची चोरी झाली होती. ही चोरी सनाउल्ला, त्याचा मित्र नरसिंह मूर्ती व अर्जुन या तिघांनी केल्याचा संशय एमडी गॅंगला आला होता. त्यानंतर गॅंगने त्या तिघांना वेगवेगळ्या ठिकाणी डांबून घालून हत्यारांनी मारहाण केली व वीजेचा शॉक देऊन छळ केला. त्यात अर्जूनचा मृत्यू झाला होता. या गॅंगने पुरावा नाहीसा करणे, मृतदेहाची व मुद्देमालाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद सनाऊल्लाने दिली होती. त्यानुसार टोळीवर गुन्हा दाखल झाला होता. यातील संशयित महेश दळवी, अभिनंदन धडेल व समीर पट्टेकरी या तिघांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. 

गुन्ह्याची पार्श्‍वभूमी लक्षात घेवून पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमूख यांनी तपासाचे आदेश जयसिंगपूर पोलिस उपअधीक्षक किशोर काळे यांना दिले. तपासात गुटखा व्यवसायातील आंतरराज्यीय संघटित गुन्हेगारीचा व आर्थिक लाभातून निर्माण केलेल्या वर्चस्वाचा लेखाजोखा पुढे आला. "एमडी गॅंग'वर जयिंगपूर, शिवाजीनगर, राजारामपुरी, सांगली ग्रामीण, सांगली शहर, मिरज शहर, नागपूर शहर आणि अन्न औषध प्रशासन येथे गंभीर व दखलपात्र असे 21 गुन्हे दाखल असल्याची माहिती पुढे आली. त्यानुसार उपअधीक्षक काळे यांनी या गॅंगवर मोका अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव तयार करून तो पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे सादर केला. त्यास विशेष पोलिस महानिरीक्षक सुहास वारके यांनी मंजुरी दिल्याचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांनी सांगितले. 

समाजकंटकांवर होणार कारवाई 
कर्नाटक, गोवा, आंध्रप्रदेश, दिव-दमण आदी राज्यासह केंद्र शासीत प्रदेशातून राज्यात अवैध व्यवसायाचे संचन करणारे व संघटित गुन्हेगारी करणाऱ्या समाजकंटकांवर येथून पुढे कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com