Jotibas Chaitra Yatra canceled
Jotibas Chaitra Yatra canceled

ब्रेकिंग : दख्खनचा राजा जोतिबाची चैत्र यात्रा रद्द 

Published on

जोतिबा डोंगर -  महाराष्ट्र कर्नाटक गुजरात आंध्र प्रदेश या राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी तथा जोतिबा डोंगर (ता. पन्हाळा)  येथील दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची चैत्र यात्रा कोरोनाचा संभाव्य संसर्ग टाळण्यासाठी रद्द करण्यात आली. आज  जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या प्रमुख उपस्थित जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. त्यात हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

इतिहासात प्रथमच यात्रा रद्द होण्याचा हा प्रसंग आहे. जोतिबाच्या चैत्र यात्रेसाठी डोंगर दरवर्षी राज्यभरातून आठ ते नऊ लाख भाविक येतात. वर्षातून एकदा चैत्र यात्रेस जोतिबाची पालखी मुळमाया यमाईदेवीच्या  भेटीसाठी जाते. तसेच यात्रेत मानाच्या ९६ सह विविध रंगी ७०० सासन काठ्या सहभागी होतात. त्यांची दुपारी भव्य मिरवणूकही निघते. यंदा मात्र सर्व जोतिबा भक्तांना  कोरोनाच्या कारणामुळे यात्रेस मुकावे लागणार आहे. गेल्या रविवारपासून डोंगरावर कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मंदिर बंद ठेवले आहे. परिणामी भाविकांची  गर्दी होऊ दिली नाही. येणारे भाविक मुख दर्शन व शिखर दर्शन घेऊनच माघारी फिरले. यात्रा रद्द झाल्यामुळे कोट्यावधी रुपयांचे नुकसान  जोतिबा डोंगरावर होणार असून सर्वच व्यापारी दुकानदार ग्रामस्थ पुजारी यांना मोठी झळ पोहचणार आहे.

दरम्यान, आज दुपारी पन्हाळ्याचे प्रांताधिकारी अमित माळी यांनी जोतिबा ग्रामस्थ, पुजारी , दहागावकर यांची यात्रे संदर्भात प्राथमिक बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये होणारे धोके सांगितले. पुजारी ग्रामस्थांनी ही चर्चा केली. दुपारी जोतिबाचे गावकर प्रतिनिधी प्रांताधिकारी यांनी जिल्हा अधिकाऱ्यांसमोर यात्रे संदर्भात पुन्हा चर्चा केली आणि त्यात  चैत्र यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

आठवणीना उजाळा 
डोंगरावर पूर्वी प्लेगची साथ आली होती, त्यावेळी प्रशासनाने चैत्र यात्रा बंद केली होती . प्लेगची साथ असतानासुद्धा निनाम पाडळी (सातारा ) येथील ग्रामस्थ सासन काठी घेऊन यात्रेला डोंगरावर आले आणि त्यांना पहिल्या क्रमांकाची सासनकाठीचा बहुमान मिळाला. आज कोरोनाच्या निमित्ताने या आठवणीना उजाळा मिळाला.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com