
राधानगरी : येथील बाजारपेठ मध्ये अज्ञात व्यक्तीचा बाण लागून घायाळ झालेल्या एका वानराला वाचवण्यासाठी राधानगरी कर 'घायाळ' झाले होते. जखमी मुक्या प्राण्याचा जीव वाचवण्यासाठी गावकऱ्यांसह वन्यजीव विभागाची धडपड रात्री उशिरापर्यंत सुरू होती. अखेर त्याला रात्री उशीरा पकडून उपचार सुरू केले. मात्र पुढील उपचारासाठी कोल्हापूरला नेत असताना त्याचा रात्री उशीरा मृत्यू झाला आणि सर्वांचे प्रयत्न निष्फळ ठरले.
काल सोमवारी सायंकाळी येथील मुख्य बाजारपेठेमध्ये एका झाडावर अज्ञात व्यक्तीने मारलेला बाण एका वानराच्या कळपातील वानराच्या छातीत घुसून त्या बाणासह झाडावरून उड्या मारत असल्याचे लोकांच्या निदर्शनास आले. हे जखमी वानर वाचवण्यासाठी मग गावकऱ्यांची धावपळ सुरू झाली. नेचर क्लबचे सम्राट केरकर यांनी वन्यजीव विभागाला तातडीने कळवले व त्या वानराला पकडण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली. परंतु बिथरलेले वानर या झाडावरून त्या झाडावर उड्या मारीत असल्याने पकडणे अवघड होत होते. सायंकाळी सातनंतर कोल्हापूरहून वन्यजीव विभागाची रेस्क्यू टीम पाचारण करण्यात आली. परंतु वानर हाताला लागले नाही ते बाण घेऊनच उड्या मारीत होते. घायाळ वानराला वाचण्यासाठी रात्री उशिरापर्यंत राधानगरीकर प्रयत्न करत होते.
वन्यजीव विभागाचे वनक्षेत्रपाल नवनाथ कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता वन्यजीव विभागाची टीम कार्यरत असून रात्री अंधार व वानर झाडात लपल्याने त्याला पकडणे अवघड जात असल्याचे सांगितले होते. तरीही जिद्द सोडली नव्हती.
दरम्यान वन विभागच्या कोल्हापूर रेस्क्यू टीम ने रात्री सव्वानऊ वाजता हे जखमी वानर पकडले व राधानगरी वन्यजीव ऑफिसला हे जखमी वानर ठेवले. त्याच्यावर उपचार सुरू केले. मात्र जखम खोल असल्याने त्याला रात्री अकरा वाजता कोल्हापूरला नेत असताना वाटेत मृत्यू झाला.अभयारण्य परिसरात येथील लोकांचे राहणीमान असल्याने निसर्ग आणि प्राण्यांबाबत आत्मीयता आहे. या मानवतेतूनच ही भूतदय दिसून आली. पण सर्वांचे प्रयत्न व्यर्थ ठरले.
संपादन - अर्चना बनगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.