esakal | कोल्हापूरात आज आणखी १८१ जणांना कोरोनाची बाधा...
sakal

बोलून बातमी शोधा

more 181 corona patient found in kolhapur total count 11408

शेंडा पार्क येथे वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सूक्ष्मजीवशास्त्र परीक्षण प्रयोगशाळेतील कोरोना चाचणीला पुन्हा सुरुवात झाली .

कोल्हापूरात आज आणखी १८१ जणांना कोरोनाची बाधा...

sakal_logo
By
शिवाजी यादव

कोल्हापूर : मंगळवार रात्री दोन वाजल्यापासून सकाळी नऊ वाजेपर्यंत १८१ कोरणा बाधित आलेले आहेत.त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या वर ११,४०८ पोहचली आहे 
 आज आलेल्या  रुग्णांमध्ये कोल्हापूर २७, हातकणंगले १२, कागल ६, इचलकरंजी राधानगरी करवीर २५, अन्य तालुक्यातील असे मिळून १८१ आहेत . यामध्ये मृत दोन व्यक्तींचा समावेश आहे.


शेंडा पार्क येथे वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सूक्ष्मजीवशास्त्र परीक्षण प्रयोगशाळेतील कोरोना चाचणीला पुन्हा सुरुवात झाली असून त्यामुळे अहवालांची संख्या वाढू लागली आहे.  काल  २४ तासांत जिल्ह्यात कोरोनामुळे तब्बल २० जणांचा मृत्यू झाला आहे. त्याने बळींचा ३०० चा टप्पा पूर्ण केला. मृतांत शहरातील टाकाळा, उत्तरेश्‍वर पेठ व मंगळवार पेठेतील तिघांचा समावेश आहे.

हेही वाचा- ग्रेस गुण उलट तपासणीसाठी  क्रीडा कार्यालयाचे माध्यमिक शिक्षण मंडळाला पत्र -


दरम्यान, आज नव्या ४४६ कोरोनाग्रस्तांची भर पडली. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचा समूह संसर्ग सुरू असल्याचे दररोज वाढणाऱ्या रुग्ण संख्येवरून स्पष्ट होत आहे. त्यात बाधितांच्या संपर्कात आलेल्या लोकांची संख्या जास्त आहे. आज गडहिंग्लज, गगनबावडा तालुक्‍यात कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नाही; पण इतर तालुक्‍यात रुग्णांची वाढती संख्या कायम आहे. 


शहरात काल  तब्बल २२२ नवे रुग्ण आज आढळून आले आहेत. कोरोनामुळे जिल्ह्यातील २० रुग्णांचा मृत्यू झाला. यात १७ पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. इचलकरंजीतील चौघांचा काल  मृत्यू झाला. अन्य मृतांत हातकणंगले तालुक्‍यातील नेज, हुपरी, कबनूर, तारदाळ, पेठवडगाव, वाठार तर्फ वडगाव येथील रुग्णांचा समावेश आहे. एका खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या चिक्कोडी (कर्नाटक) येथील रुग्णाचाही आज मृत्यू झाला. 

हेही वाचा- शिक्षकांच्या रिक्त पदामुळे शाहूवाडीत शिक्षणाचा बोजवारा उडणार -


आजपर्यंतची मृतांची संख्या 304 वर पोहचली आहे. यात शहरातील ६५ जणांचा समावेश असून १२ तालुक्‍यात १०९, पालिका कार्यक्षेत्रात ११७ तर जिल्ह्याबाहेरील ११ रुग्णांचा समावेश आहे. आज दिवसभरात २२९२ रुग्णांची तपासणी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयासह जिल्ह्यातील इतर रुग्णालयात करण्यात आली. यातील लक्षणे दिसत असलेल्या १२५५ जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. आज २६६ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत चालल्याने त्याचा मोठा ताण वैद्यकीय यंत्रणेसह प्रशासनावर येत आहे. 

हेही वाचा-अशी झाली जोतिबाची नगरप्रदक्षिणा,अकरा ग्रामस्थांची उपस्थीती, भाविकांना परवानगी नाकारली -

दृष्टिक्षेपात कोरोना...
  आजपर्यंतचे बाधित     ११४०८
  आजचे कोरोनामुक्त    २६६
  आजपर्यंतचे कोरोनामुक्त    ४६०३
  आजपर्यंतचे मृत्यू    ३०४ 
  प्रत्यक्ष उपचार घेणारे    ७५०३

संपादन - अर्चना बनगे

go to top