morning walk and jogging for people with his pet animal dog is harmful to rankala lake in kolhapur
morning walk and jogging for people with his pet animal dog is harmful to rankala lake in kolhapur

सावधान ! रंकाळ्यावर कुत्री आणताय ?

सानेगुरुजी वसाहत (कोल्हापूर) : कोल्हापूरचे वैभव असलेल्या रंकाळा तलावावर कुत्री आणू नयेत, यासाठी नागरिकांचे प्रबोधन केले जाणार आहे. ‘आपला रंकाळा, स्वच्छ रंकाळा’ अशा आशयाचे फलक लवकरच झळकणार आहेत. रंकाळ्यावर फिरायला येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. लॉकडाउनच्या काळात खाद्यपदार्थाच्या गाड्या बंद असल्याने भटकी कुत्री अधिक आक्रमक झाली होती.

क्रशर चौक ते अंबाई टॅंक या मार्गावर भटक्‍या कुत्र्यांचा उपद्रव असतो. उद्याने बंद असल्याने कुत्री थेट रस्त्यावर येऊन अंगावर धाऊन येण्यास मागे पुढे पाहत नाहीत. भटक्‍या कुत्र्यांना कोणी वाली नसतो, असे म्हटले जाते; पण पाळीव कुत्र्यांना मात्र निश्‍चित वाली असतो. आता हीच कुत्री रंकाळ्यावर डोकेदुखी ठरू लागली आहेत. स्वच्छ रंकाळ्याची हाक एका बाजूला दिली असताना कुत्री तलावाच्या भोवती उघड्यावर घाण करत आहेत. खासगीरित्या कुत्रे पाळले तर त्याची निगा राखण्याची जबाबदारी मालकाची असते. मात्र, सार्वजनिक जागा कुत्री फिरविण्यासाठी आहे. तसा फेरफटका मारायलाही काही हरकत नाही. मात्र कुत्र्यांची घाण तलावाचे सौंदर्य बिघडवत आहेत.

रंकाळा चौपाटी, पदपथ उद्यान, खाणीचा परिसर येथे कुत्री फिरविली जातात. मालकाच्या हाती साखळी नसल्यास कुत्री अंगावर धाऊन येतात. रंकाळ्यावर कुत्रे घाण करण्यासाठी आणता का अशी कोणी विचारणा केली तर त्यालाच उद्धटपणे उत्तर दिले जाते. रंकाळ्याच्या भोवती विविध विकासकामे हाती घेतली आहेत. सार्वजनिक ठिकाणी लोकांना अधिक अधिक मोकळा श्‍वास घेता यासाठी सौंदर्यात भर घालण्याचे काम सुरू आहे.

अनलॉक पाच सुरू होऊनही उद्याने अद्याप बंद आहेत. सार्वजनिक रस्त्यावर थूंकू नये अशी चळवळ सुरू आहे. त्याच धर्तीवर कुत्र्यांचा पर्यायाने त्यांच्या मालकांचा बंदोबस्त करण्याची वेळ आल्याची प्रतिक्रिया रंकाळाप्रेमीतून व्यक्त होत आहे  येत्या काही दिवसात फलक लावून कुत्री न आणण्यासंबंधी आवाहन केले जाणार आहे. त्यातून सुधारणा न झाल्यास दंडात्मक कारवाईचा विचार सुरू आहे.

"चौपाटी तसेच पदपथ उद्यानाचा परिसर स्वच्छ ठेवणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे. पाळीव कुत्र्यांमुळे परिसर अस्वच्छ होणार असेल तर ही काही चांगली बाब नाही. प्रारंभी बोर्ड लावून कुत्री न आणण्याबाबत आवाहन केले जाईल. त्यात फरक न पडल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा विचार आहे."

- शारंगधर देशमुख, नगरसेवक

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com