हृदयद्रावक : लेकीच्या मृत्यूची बातमी समजताच आईनेही सोडले प्राण

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 13 September 2020

हृद्द विकाराचे तीव्र झटक्याने त्यांचा मृत्यू झाला.

तुरुकवाडी (कोल्हापूर) : लेकीच्या मृत्यूची बातमी समजताच मातेने सोडले प्राण ही हृद्य हेलावणारी दुर्दैवी घटना रविवारी माणगाव (ता. शाहूवाडी )येथे घडली. या घटनेबाबत परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
माणगाव येथील ताराबाई नामदेव आडसूळ (वय 80 )यांना चार आपत्य त्यांचे पतीचे दहा वर्षा पूर्वी निधन झाले.त्यांची मुलगी कुसुम कांबळे (वय 50 ) यांचा विवाह नेर्ले( ता शाहूवाडी )येथील नथूराम कांबळे यांचेशी झाला होता. त्या मुंबई येथे वास्तव्यास होत्या .त्यांना अस्वस्त वाटु लागल्याने दवाखान्यात दाखल केले होते .रविवारी रात्री साडे बारा वाजणेच्या सुमारास हृद्द विकाराचे तीव्र झटक्याने त्यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा- भाजपकडून महाविकास आघाडीला उकसवण्याचे कटकारस्थान -

या घटनेची माहिती ताराबाई आडसूर यांना समजताच हृद्य विकाराच्या झटक्याने त्यांचाही मृत्यू झाला. लेकीच्या मृत्यूची बातमी समजताच मातेने सोडले प्राण या घटनेने माणगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे .ताराबाई आडसूर यांचा जलधानवीधी मंगळवारी तर कुसुमताई यांचा शनिवारी जलधानविधी आहे.

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mother died as soon as she heard the news of daughter death case in shahuwadi kolhapur