कोल्हापुरात मोटारसायकल चोरट्यास अटक ; पाच मोटारसायकल जप्त  

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 11 November 2020

राजेंद्रनगर येथील साथिदार संशयित सूरज पाटील याच्याकडे दिल्या असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

कोल्हापूर - शहरासह जिल्ह्यातून मोटारसायकल चोरणाऱ्या चोरट्यासह त्याच्या साथिदारास लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली. त्या दोघांकडून पाच मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. 

अटक केलेल्या संशयितांची नावे ः सागर रामदास सरवणकर (वय 22, रा. बीडी, ता. खानापूर, बेळगाव, सध्या रा. येवती, करवीर) आणि सूरज गणेश पाटील (वय 27, रा. राजेंद्रनगर) अशी त्यांची नावे आहेत. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे गुन्हे शोध पथक गस्त घालत होते. त्यावेळी पंचगंगा घाट परिसरात संशयित सागर सरवणकर हा मोटारसायकल घेऊन संशयितरित्या फिरत असताना मिळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. त्याने लक्ष्मीपुरी, जुना राजवाडा आणि गडहिंग्लज पोलिस ठाण्याच्या हद्दीतून मोटारसायकल चोरी केल्या. त्या विकण्यासाठी राजेंद्रनगर येथील साथिदार संशयित सूरज पाटील याच्याकडे दिल्या असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

हे पण वाचाबेटिंग घेणाऱ्या सात जणांना अटक ; इचलकरंजीत दोन छापे

त्या दोघांकडून पाच मोटारसायकली जप्त केल्या. ही कारवाई पोलिस निरीक्षक अनिल गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुनिता शेळके, कर्मचारी तानाजी गुरव, राजेंद्र संकपाळ, मुनाफ मुल्ला, रोहित मर्दाने, इर्शाद महात, सिद्धेश्‍वर केदार तानाजी दावणे, प्रतिक शिंदे यांनी केली. 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Motorcycle thief arrested in Kolhapur