esakal | मुख्यमंत्र्यांनी संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा ; कोल्हापुरात 'भाजप' च्या महिला कार्यकर्त्यांचा रास्ता रोको

बोलून बातमी शोधा

movement of women of BJP in kolhapur against arrested by sanjay rathod in kolhapur}

बिनखांबी गणेश मंदिरालगतचा रस्ता सुमारे अर्धा तास महिला कार्यकर्त्यांनी रोखून धरला. 

मुख्यमंत्र्यांनी संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा ; कोल्हापुरात 'भाजप' च्या महिला कार्यकर्त्यांचा रास्ता रोको
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : ठाकरे सरकारने वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या महिला तसेच युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापूरात आज रास्ता रोको आंदोलन केले. राज्य शासनाच्या विरोधात यावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या. यावेळी बिनखांबी गणेश मंदिरालगतचा रस्ता सुमारे अर्धा तास महिला कार्यकर्त्यांनी रोखून धरला. 

पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी राठोड यांच्या भोवती संशयाचे वातावरण असताना त्यांना वाचविण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकार करत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात महिला जितक्‍या सुरक्षित होत्या. छत्रपतींच्या नावे मते मागायची आणि प्रत्यक्ष महिलांच्या सुरक्षिततेकडे डोळेझाक करण्याचे पाप सरकार करत आहे. महिलांचा मान सन्मान ठेवायचा असेल, तर राठोड यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा घ्यावा. अशी मागणी महिला कार्यकर्त्यांनी भाषणात केली. 

हेही वाचा - @कोल्हापूर स्पोर्टस्‌ डिरेक्‍टरी! जिल्हा क्रीडा कार्यालयाचे पुढचे पाऊल -

महाविकास आघाडी सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय, राठोड यांना संरक्षण देणाऱ्या शासनाचा धिक्कार असो अशा घोषणा देण्यात आल्या. महिला तसेच युवा कार्यकर्त्यांनी रस्ता रोखून धरला. त्यामुळे बिनखांबीमार्गे महाद्वार रोड तसेच मिरजकर तिकटीकडे जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. अर्ध्या तासानंतर जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या महिला कॉन्स्टेबल दाखल झाल्या.

यावेळी रस्त्यावर ठाण मांडलेल्या महिला जिल्हाध्यक्षा गायत्री राऊत यांना ताब्यात घेतले. त्यांना पायी पोलिस ठाण्याकडे नेण्यात आले. त्यांच्या पाठोपाठ महिला कार्यकर्त्याही घोषणा देत पोलिस ठाण्याकडे गेल्या. विद्या बनसोडे, आसावरी जुगदार, विजयमाला जाध, स्वाती कदम, शुभांगी चितारे, जयश्री चितारे, सुनिता सुर्यवंशी, प्रमोदिनी हार्डीकर, विजयसिंह खाडे-पाटील आदी आंदोलनात सहभागी झाले. 

संपादन - स्नेहल कदम